राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते ‘ रॉयल इनफिल्ड ‘ दुचाकी शोरूमचे उदघाटन संपन्न
सिल्लोड (शेख चांद प्रतिनिधी ) दि.28, शहरात नव्याने सुरू झालेल्या ‘रॉयल इनफिल्ड ‘या बुलेट दुचाकी शोरूमचे उदघाटन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते रविवार ( दि.27 ) रोजी संपन्न झाले.
सिल्लोड येथे मोठा ग्राहक वर्ग असल्याने औरंगाबाद प्रमाणे अनेक ब्रँडेड कंपन्यांनी सिल्लोड शहरात आपले शोरूम सुरू केले आहेत. युवकांमध्ये आकर्षण असलेल्या रॉयल इनफिल्ड या दुचाकीचे शोरूम आज सुरू झाले यामुळे ग्राहकांना औरंगाबाद ऐवजी सिल्लोड येथेच बऱ्याच सुविधा निर्माण होत आहेत असे स्पष्ट करीत शोरूमच्या उदघाटन निमित्ताने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुर्डेश्वर संस्थान चे पिठाधिश ह.भ.प. ओंकारगिरी महाराज, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा.लोखंडे, नगराध्यक्षा राजश्री निकम, पंचायत समितीच्या सभापती डॉ. कल्पना संजय जामकर, सेवा निवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, राजेंद्र ठोंबरे, दामूअण्णा गव्हाणे, नरेंद्र ( बापू ) पाटील, सुदर्शन अग्रवाल, नगरसेवक सुधाकर पाटील, प्रशांत क्षीरसागर, मनोज झंवर, कौतिकराव मोरे,विशाल बावस्कर, शेख इम्रान, मारुती पाटील, यांच्यासह अनिल काळे, अभिषेक काळे, ऋषिकेश काळे आदिंची उपस्थिती होती.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतली दुचाकीची ट्रायल
रॉयल इनफिल्ड शोरूमच्या उदघाटना नंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शोरूम पुढे उभ्या असलेल्या दुचाकींची पाहणी केली. त्यानंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी या दुचाकीची ट्रायल घेतली. हा प्रसंग कॅमेरात कैद करण्यासाठी अनेकांची धडपड दिसून आली. तर अचानकपणे राज्यमंत्री दुचाकी वर जात असल्याचे पाहून सुरक्षा रक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली.