BREAKING NEWS:
नागपुर

कांद्री येथे ६५, ७०० रूपयाची घरफोडी

Summary

नागपूर कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कांन्द्री बस स्टाॅप जवळील रहिवासी पुजा रविंन्द्र पोटभरे यांचा घरी अज्ञात चोरांनी घरफोडी करून सोने, चांदीचे दागिने ६५,७०० रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू […]

नागपूर कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कांन्द्री बस स्टाॅप जवळील रहिवासी पुजा रविंन्द्र पोटभरे यांचा घरी अज्ञात चोरांनी घरफोडी करून सोने, चांदीचे दागिने ६५,७०० रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .
प्राप्त माहिती नुसार गुरुवार दि.२४ जुन २०२१ ला रात्री ८:०० वाजता दरम्यान पुजा रविंन्द्र पोटभरे वय २८ वर्ष राह. कांन्द्री बस स्टाॅप जवळ घराला कुलुप लावुन आईच्या घरी गेले असता शुक्रवार दि. २५ जुन २०२१ ला रात्री १० ते ११ वाजता दरम्यान अज्ञात चोरांनी कुलुप तोडुन घराच्या आत प्रवेश करू न आलमारी मध्ये ठेवलेले सोने, चांदीचे दागिने एकुण किंमत ६७,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने कन्हान पोस्टे ला फिर्यादी पुजा रविंन्द्र पोटभरे च्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *