लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज जातीभेद निर्मूलन ,अस्पृश्यता निवारण ,स्त्रियांचा उद्धार, बहुजनांचा शैक्षणिक विकास, औद्योगिक प्रगती ,शेतीचा विकास इत्यादी क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने उपेक्षित वंचित समाजासाठी वापरणारे आरक्षणाचे प्रणेते
Summary
लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज जातीभेद निर्मूलन ,अस्पृश्यता निवारण ,स्त्रियांचा उद्धार, बहुजनांचा शैक्षणिक विकास, औद्योगिक प्रगती ,शेतीचा विकास इत्यादी क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने उपेक्षित वंचित समाजासाठी वापरणारे आरक्षणाचे प्रणेते—————- आरक्षण देणारा पहिला राजा ,जे पालक आपल्या […]
लोकराजा
छत्रपती राजश्री शाहू महाराज
जातीभेद निर्मूलन ,अस्पृश्यता निवारण ,स्त्रियांचा उद्धार, बहुजनांचा शैक्षणिक विकास, औद्योगिक प्रगती ,शेतीचा विकास इत्यादी क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने उपेक्षित वंचित समाजासाठी वापरणारे आरक्षणाचे प्रणेते—————-
आरक्षण देणारा पहिला राजा ,जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना एक रुपया दंड ठोकणारा राजा, कला, संस्कृती, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा ,सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारा राजा राजश्री छत्रपती शाहू महाराज .
राजश्री छत्रपती शाहू राजे यांना मानणाऱ्या व त्यांचे ज्यांच्यावर उपकार आहेत त्या कुटुंबाने आपल्या घरात शाहू जयंती सणाप्रमाणे साजरी करावी.
एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की लोक केवळ शाहूंचा जय जय कार करतात त्यांच्या जयंतीदिनी घराबाहेर अभिवादन व व्याख्यानाचा कार्यक्रम घेतात पण त्यातील 99 टक्के लोक घरात शाहू जयंती साजरी करत नाही लोक राजेंनी नाकारलेल्या प्रवृत्तींना सांगितलेल्या रूढी-परंपरा घरातून जपल्या जातात. शाहू राजांचे विचार प्रत्येक घरात रुजली तर या देशात विषमता आणि जाती वादाचे समूळ नष्ट होणार आहे .माणसाची मनुवादी वृत्ती निघून जाईल .आपल्या घरात शाहू जयंती सणाप्रमाणे साजरी केली.( शाहू जन्मदिन सणाप्रमाणे साजरा करण्याचे आवाहन सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 22 मार्च 1920 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथे झालेल्या सभेत केले होते .) तरच शाहूंचे विचार समाज आणि मग देशभर रुजतील शाहूराजांनी शिक्षण व आरक्षणाच्या माध्यमातून मराठा सह अन्य बहुजना वर प्रचंड उपकार केले आहे अशा कुटुंबाची तरी आपल्या घरी शाहू जयंती खालील प्रमाणे कृतीद्वारे साजरी करून आपले नैतिक कर्तव्य पार पाडावे.
1. घराबाहेर आपल्या पसंतीचा ध्वज फडकावणे.
2. घराला लायटिंग लावणे अथवा आकाश दिवा लावणे.
3. घराबाहेर जयंतीच्या शुभेच्छा देणारी रांगोळी काढणे.
4. शुभ्र पांढऱ्या वस्त्रांचा पेहराव करणे शक्य झाल्यास नवीन कपडे घेणे.
5 . किमान पाच कुटूंबांना जयंतीच्या शुभेच्छा देणे .
6. घरी शाहू प्रतिमा पुष्पहार घालून अभिवादन करणे.
7 . घरी पुरणपोळीचे जेवण करणे किंवा गोड पदार्थ करणे.
8 . शक्य झाल्यास जयंती या मंगल दिनी नवीन वस्तू खरेदी करणे .
9 . शाहू जयंतीच्या माध्यमातूनही त्या कुटुंबाने स्वतःला शाहू अनुयायी असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे.
10 . घरी अथवा सार्वजनिक ठिकाणी राजश्री छत्रपती शाहू यांच्या विचार व आचार आवर व्याख्यानाचे आयोजन करणे.