कास्ट्राईब कर्मचारी संघटना मुल शाखेतर्फे जाहीर आवाहन
Summary
सर्व कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या सभासदांना,शुभचिंतकांना आग्रहाची विनंती आहे की, सर्वांनी स्वतः,कुटुंबासह, आपल्या सहकाऱ्यासोबत, मित्रासमवेत ज्या पद्धतीने होईल,त्यापद्धतीने चंद्रपूर येथे होणाऱ्या उद्याच्या आक्रोश मोर्चात सामील व्हावे…ही आपली जबाबदारीच नाही तर आपल्या न्याय-हक्कासाठी असलेली जाणीव आहे, लढाई आहे,कर्तव्य आहे…. मी सामील […]
सर्व कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या सभासदांना,शुभचिंतकांना आग्रहाची विनंती आहे की, सर्वांनी स्वतः,कुटुंबासह, आपल्या सहकाऱ्यासोबत, मित्रासमवेत ज्या पद्धतीने होईल,त्यापद्धतीने चंद्रपूर येथे होणाऱ्या उद्याच्या आक्रोश मोर्चात सामील व्हावे…ही आपली जबाबदारीच नाही तर आपल्या न्याय-हक्कासाठी असलेली जाणीव आहे, लढाई आहे,कर्तव्य आहे….
मी सामील झालो नाही तर काय होणार… बाकीचे तर आहेत ना? असे करून चालणार नाही… असा विचार प्रत्येकानेच केला तर… पुढे आपली नोकरीचे काय…? अस्तित्वही राहणार नाही..बाबासाहेबांनी अथक परिश्रमाने मिळवून दिलेले आरक्षण आपल्या नाकर्तेपणामुळे नामशेष होत असेल तर आपण स्वतः जबाबदार असू… पुढची पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही…!
मी, माझं कुटुंब सुखी आहे.. बसं झालं….दुसऱ्याशी काय करायचं? ही स्वार्थी वृत्ती बाजूला ठेवून समाजासाठी, आपल्या न्याय- हक्कासाठी संघर्षासाठी तयार व्हा… आपल्या लढाईसाठी दुसरा कुणीही येणार नाही…तो आपल्यालाच लढावा लागेल…! !
विचार करा… आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी,आपल्या स्वाभिमानासाठी..लढ्यात सामील व्हा… लढा यशस्वी करण्यास सहकार्य करा….! ! !
असे आवाहन संघटनेचे पदाधिकारी जगदीप दुधे व सुनिल निमगडे
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ तालुका शाखा मूल तर्फे करण्यात आले आहे.
