महाराष्ट्र राजकीय हेडलाइन

झकास पठार विकास संकल्पना ; रानफुलांनी बहरणार अजिंठा लेणीचा परिसर अजिंठा लेणीच्या सौन्दर्यात पडणार आणखी भर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते ह्यू पॉईंट येथे करण्यात आले विविध फुल झाडांचे बीजारोपण झकास पठार संकल्पना राज्यभर राबविणार – राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे प्रतिपादन

Summary

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.20, जगप्रसिध्द अजिंठा लेणीच्या सौन्दर्यात भर पडावी, येथील पर्यटन व्यवसायाला अधिक चालना मिळावी व स्थानिकांना यातून रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी अजिंठा लेणी परिसरात विविध उपाययोजना राबविण्यात येत असून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्या […]

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.20, जगप्रसिध्द अजिंठा लेणीच्या सौन्दर्यात भर पडावी, येथील पर्यटन व्यवसायाला अधिक चालना मिळावी व स्थानिकांना यातून रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी अजिंठा लेणी परिसरात विविध उपाययोजना राबविण्यात येत असून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्या झकास पठार या संकल्पनेतून आज ह्यू पॉंइंट येथे बीजारोपण करण्यात आले. येत्या काही दिवसात हे झकास पठार लेणीच्या सौन्दर्यात भर घालून पर्यटकांना आकर्षित करतील असा विश्वास व्यक्त करीत जिल्हाभरात पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यात येणारा हा प्रयोग यशस्वी झाल्यास ग्रामविकास विभागाच्या वतीने राज्यभर ” झकास पठार ” हा उपक्रम राबविणार असल्याचे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्या संकल्पनेतून तसेच सातारा जिल्ह्यातील कास पठाराच्या धर्तीवर अजिंठा येथील ह्यू पॉईंट येथे विविध फुलझाडांचे बीजारोपण राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.

या प्रसंगी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, शिवसेना तालुका प्रमुख देविदास लोखंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, पिंपळदरीच्या सरपंच सुरया तडवी, अशोक सूर्यवंशी, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी अशोक दांडगे ( सिल्लोड ) ,सुदर्शन तुपे ( सोयगाव ) साहायक गटविकास अधिकारी ज्योती राठोड, प्रादेशिक वन अधिकारी अनिल मिसाळ, अजिंठा वन परिक्षेत्र अधिकारी एस.पी. मानधरे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
———————————————-

यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अजिंठा डोंगर रांगांची ह्यू पॉईंट वरून पाहणी केली. कोरोनाच्या संकटात ऑक्सिजन किती महत्वाचे आहे हे सगळ्यांना कळले. अजिंठा डोंगर रांगात नैसर्गिक ऑक्सिजन ला चालना देणारी तसेच दुर्मिळ वनस्पती असलेल्या वृक्षांची लागवड करणे गरजेचे असल्याने अजिंठा डोंगर रांगेत किमान 25 लाख वृक्ष लागवड करण्याच्या सूचना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित विभागाला दिल्या. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी अजिंठा लेणी तसेच ह्यू पॉइंट येथे रोजगाराच्या संधी नवीन व्यापार संकुल निर्माण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिल्या.

—————

*महसुल राज्यमंत्र्यांनी स्वतः केली झकास पठाराची ट्रक्टरने मशागत*

*आणि लोक बघतच राहिले…*

झकास पठार उपक्रमातील सदस्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी स्वतः बीजारोपण केले. सोबतच राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवून जमिनीची मशागत केली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ट्रॅक्टर चालविले तर त्यांच्या मागे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले आणि वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. मानधरे बसले होते. इतकेच नाही तर जमिनीवर बसून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सर्वांसोबत वन भोजनाचा यथ्येच स्वाद घेतला. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा साधेपणा आणि त्यांनी या उपक्रमाला दिलेले प्रोत्साहन पाहून उपस्थित वन मजूर, कर्मचारी, अधिकारी , गावकरी सर्वच जण अचंबीत झाले. त्यानंतर परिसरात या चर्चेला चांगलेच उधाण आले.
—————————
रानफुलांच्या 70 प्रकारच्या बियाणे जमा करण्यात आले असून ह्यू पॉईंट येथे एक हेक्टर जमिनीवर आज याचे बीजारोपण करण्यात आले आहे. आपल्याकडे जून ते आक्टोबर दरम्यान पर्यटकांचा ओघ असतो. तो ओघ या झकास पठारांमुळे वाढेल. या उपक्रमाला सुरुवातीपासूनच राज्यमंत्री ना अब्दुल सत्तार यांनी प्रोत्साहन दिले आहे. हा उपक्रम नाविन्यपूर्ण आहे. यात राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांचे पाठबळ असल्याने हा उपक्रम शंभर टक्के यशस्वी होईल
– डॉ.मंगेश गोंदावले ( जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *