दुकानांचा कालावधी सायंकाळी ७ पर्यंत वाढवा – फेडरेशन ऑफ़ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ची मागणी फेडरेशनच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत दिले निवेदन सोमवार पासुन दुकानांची वेळ वाढवून मिळण्याची शक्यता

चंद्रपूर – फेडरेशन ऑफ़ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सदस्यांनी आज मा. जिल्हादंडाधिकारी यांची भेट घेऊन आस्थापनाची वेळ सायंकाळी ७ वाजेपर्यंत करावी व शनिवारी व रविवारी देखील संध्याकाळी ७.०० वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची मुभा द्यावी असे भेट घेत निवेदन दिले.
माननीय जिल्हा दंडाधिकार्यांनी आमची मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले. सोमवारपासून दुकाने बंद ठेवण्याची वेळ संध्याकाळी ७.०० पर्यंत होण्याची शक्यता आहे शक्यतो शनिवारी आणि रविवारी देखील व्यवसाय सुरु राहू शकणार आहे याबाबत माहिती आल्यास सर्वच व्यापाऱ्यांना त्याची माहिती देण्यात येईल असे फेडरेशनच्या सदस्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देते वेळी फेडरेशन ऑफ़ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष रामकिशोर सारडा, राम जीवन परमार, राकेश टहलियानी उपस्थित होते.