शेतकरी कार्यशाळा
विरेंद्र मेश्राम तालुका प्रतिनिधीसिंदेवाही
आज दिनांक 24 /08/2020 रोज सोमवारला मौजा सिंगडझरी येथील गायमुख देवस्थान येथे आत्मा अंतर्गत शेतीशाळा वर्गाचे आयोजन करण्यात आले.सदर शेतीशाळे मधे श्री.आर.एस.धुडे कृषी सेवक शिवणी यानी शेतकरी बांधवांना धान पिकावरील किड व रोग व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच श्री अमित हातझाडे सहाय्यक गट तन्त्रज्ञान व्यवस्थापक सिंदेवाही यानी दशपर्णी अर्क तयार करणे, निंबोळी अर्क तयार करने, नीम पल्वरायझर मशीन द्वारे निंबोळी पावडर तयार करने इत्यादी विषयावर माहिती दिली त्यानंतर श्री श्यामराव कोवे यांचे शेतावर प्रक्षेत्र भेट देऊन पिकाचे निरिक्षण,कामगंध सापळे निरिक्षण घेतले सदर शेतिशाळेला श्री.राजेंद्र बोळेवार कृषी मित्र सिंगडझरी,(निंबोळी अर्क प्रत्यक्ष कृती करण्यात आले)श्री दिनकर बोरकर कृषी मित्र वासेरा तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते