गडचांदूर ते चंद्रपूर महामार्गातील भोयेगाव जवळील पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प…

राजुरा: कोरपना तालुक्यातील गडचांदूर ते चंद्रपूर जाणाऱ्या महामार्गाचे कामे सुरू आहे. मार्गातील भोयेगाव जवळील नवीन पुलाचे कामाकरिता रपटा बांधण्यात आला. परंतु काल झालेल्या जोरदार पावसात रपटा वाहून गेला. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
गडचांदूर ते भोयेगाव मार्गे चंद्रपूरला जाणार हा सिमेंट व कोळसा वाहतुकीसाठी महत्वाचा मार्ग असून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. सध्या या महामार्गाचे संथगतीने काम सुरू आहे भोयेगाव जवळील नाल्यावर नवीन पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे वळण मार्ग काढून तात्पुरता रपटा तयार करण्यात आला. परंतु काल रात्री झालेल्या मुसळधार पावसात रपटा पूर्णतः वाहून गेला,सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. रपटा वाहून गेल्याने मार्ग बंद झाला असून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.