महाराष्ट्र हेडलाइन

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते ग्रामीण पोलीस स्टेशन ईमारत व महिला विश्रांती कक्षाचे लोकार्पण सोयगाव , अजिंठा आणि फर्दापूर पोलीस स्टेशन ला लवकरच मिळणार नवीन ईमारत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा सिंहाचा वाटा – राज्यमंत्री अब्दुल सत्तार ग्रामविकास विभाग राबविणार पायलट प्रोजेक्ट ; सिल्लोड मतदारसंघात प्रत्येक बिट मध्ये पोलिसांना देणार घरे व पोलीस चौकी

Summary

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.12, कोरोना संकटात सर्वांना विश्वासात घेवून तसेच आपला जीव धोक्यात घालून 18 तास पोलिसांनी काम केले. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा सिहाचा वाटा आहे अशा शब्दांत पोलिसांचा गौरव करून पोलिसांना राहण्यासाठी सिल्लोड शहरात G+2 पध्दतीने सुसज्ज निवासस्थान […]

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.12, कोरोना संकटात सर्वांना विश्वासात घेवून तसेच आपला जीव धोक्यात घालून 18 तास पोलिसांनी काम केले. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा सिहाचा वाटा आहे अशा शब्दांत पोलिसांचा गौरव करून पोलिसांना राहण्यासाठी सिल्लोड शहरात G+2 पध्दतीने सुसज्ज निवासस्थान तसेच सोयगाव, फर्दापूर आणि अजिंठा येथील जागेचा प्रश्न मार्गी लावू यासाठी आपण प्रस्ताव सादर केल्यास तिन्ही पोलीस ठाण्याला लवकरच नवीन इमारतीसाठी मंजुरी देण्यात येईल अशी ग्वाही महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पोलीस स्टेशनच्या नवीन ईमारत लोकार्पण प्रसंगी दिली.

सिल्लोड येथील शहर पोलीस स्टेशन आवारात ग्रामीण पोलीस स्टेशनच्या नवीन इमारत तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या महिला विश्रांती कक्षाचे लोकार्पण महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना , पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे, पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलत असताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाच्या चांगल्या कामगिरीचे आज राज्यभर कौतुक होत आहे.यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रसन्ना यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले. राज्यातील पोलिसांना वेतन आयोग लागू झाल्याने पोलिसांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला. पूर्वी पेक्षा आताच्या काळात पोलीस विभागात मोठ्या प्रमाणावर सूत्रात आली असल्याचे सांगत पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी पालकमंत्री म्हणून धुळे जिल्ह्या पोलीस दलाला 54 मोठे वाहने व 100 मोटर सायकल दिल्या. सिल्लोड – सोयगाव मतदार संघातील आवश्यक त्या पोलीस ठाण्याला नवीन वाहने देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.
———————————————–
सिल्लोड शहरातील पोलिस कॉलनी तील निवासस्थानाची दुरवस्था झाली असून याठिकाणी पोलीस बांधवांसाठी G+2 पद्धतीने सुसज्ज निवासस्थान उभारण्यासाठी प्रस्ताव मंजुरी स्तरावर आहे. सिल्लोड येथे बंदोबस्त साठी बाहेरून येणाऱ्या पोलिसांना तात्पुरत्या स्वरूपात नगर परिषदेचे सभागृह दिले जाते. सिल्लोड येथे 2 एकर जागा पोलीस विभागासाठी आरक्षित केलेली असून या ठिकाणी कायमस्वरूपी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालय व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केलेला असून यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

*ग्रामविकास विभागाकडून सर्व बिट मध्ये पोलिसांना देणार घरे व पोलीस चौकी*

सिल्लोड – सोयगाव मतदार संघातील प्रत्येक गावात तलाठी कार्यालयाल देण्यात आले असून त्याच धर्तीवर ग्रामविकास विभागाच्या वतीने मतदारसंघातील सर्व बिट मध्ये पोलीस बांधवांना राहण्यासाठी निवासस्थान व पोलीस चौकी उपलब्ध करुन देण्यात येईल एक पायलट प्रोजेक्ट म्हणून हा प्रयोग मतदारसंघात राबविणे विचाराधीन असून हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास राज्यभर हा प्रोजेक्ट राबविणार असल्याची घोषणा या प्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली.
———————– ———————

प्रारंभी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना पोलीस विभागाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी नूतन इमारतीचे तसेच महिला विश्रांती कक्षातील सोयी सुविधांची पाहणी केली. उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी नगर परिषदेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत केले. पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी सूत्रसंचालन व प्रस्तावित केले. तर उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *