ना. विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकबाबत पुन्हा एकदा केले भाष्य . दुपारपर्यंत नोटिफिकेशन निघेल, अशी शक्यता . वडेट्टीवार यांनी विरोधकांच्या टीकेलाही दिलं उत्तर . वडेट्टीवारांचेही चुकले.. ते मान्य केले पाहिजे.
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि.5 जून 2021:-
राज्यातील लॉकडाऊन उठवण्यावरून गुरुवारी झालेल्या गोंधळानंतर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हात झटकले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत अंतिम निर्णय घेतील, असं ते म्हणाले होते. त्यानंतर आज पुन्हा त्यांनी संभाव्य अनलॉकबाबत भाष्य केलं आहे. (Vijay Wadettiwar on Maharashtra Unlock)
नागपूरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. ‘लॉकडाऊनमधून बाहेर नेमकं कसं पडता येईल याबाबत महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं काही गाइडलाइन्स तयार केल्या आहेत. त्याबाबतचा मसुदा मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवला आहे. त्याला एकदा मान्यता मिळाली की जिल्हावार परिस्थितीचा आढावा घेऊन ही मार्गदर्शक तत्त्वे लागू होतील. आज दुपारपर्यंत बहुधा याबाबतचे नोटिफिकेशन निघेल,’ असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
अनलॉकबाबत अंतिम मसुदा मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी प्रतिक्षेत असल्याचे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
वडेट्टीवार यांनी गुरुवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन राज्यात पाच टप्प्यांत अनलॉक होणार असल्याची घोषणा केली होती. करोना संसर्गाचा दर आणि ऑक्सिजनची सुविधा असलेल्या बेड्सची उपलब्धता या निकषावर जिल्ह्यांची वर्गवारी करण्यात आली आहे व हे जिल्हे टप्प्याटप्प्यानं निर्बंधमुक्त होतील, असं त्यांनी सांगितलं होतं. अनलॉकचे स्वरूप कसे असेल याचा संपूर्ण तपशीलही त्यांनी दिला होता. आजपासून (शुक्रवार) त्याची अंमलबजावणी होईल, असंही ते म्हणाले होते. मात्र, काही वेळातच मुख्यमंत्री कार्यालयानं खुलासा केला होता. ‘असा कुठलाही निर्णय झालेला नाही. टप्पेनिहाय निर्बंध शिथील करण्याचा प्रस्ताव केवळ विचाराधीन आहे’, असं म्हटलं होतं. त्यामुळं मोठा गोंधळ उडाला होता. त्यानंतर वडेट्टीवार यांनी सारवासारव केली होती. आज पुन्हा त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिलं.यात कुठलाही श्रेयवाद नाही! लॉकडाऊनच्या गोंधळावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. ही सरकारची अपरिपक्वता आहे की श्रेयवादाची लढाई? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्यावरही वडेट्टीवार यांनी उत्तर दिलं. ‘यात कुठलाही श्रेयवाद नाही. सरकार म्हणून आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करतोय. विरोधी पक्षाला त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे,’ असं वडेट्टीवार म्हणाले.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकबाबत पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. आज दुपारपर्यंत नोटिफिकेशन निघेल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
आज दुपारपर्यंत नोटिफिकेशन येईल असेही वडेट्टीवार यांनी
विरोधकांच्या टीकेलाही दिलं उत्तर दिले.