महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आवश्यक असणारी पूर्वतयारी करण्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या सूचना

मुंबई, दि. २ : देशातले वैद्यकीय तज्ज्ञ, टास्क फोर्सचे सदस्य यांनी राज्यात कोविडची तिसरी लाट येईल, अशी शक्यता वर्तविली असल्याने राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाने सतर्क राहून आवश्यक असणारी पूर्वतयारी करावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज संबंधित अधिष्ठाता यांना दिल्या. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयातील सर्व अधिष्ठांताशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, उपसचिव संजय सुरवसे यांच्यासह सर्व शासकीय वैद्‌यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते. अधिष्ठातांनी अधिक सतर्क रहावे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, कोविड विषाणूची तिसरी लाट येईल अशी शंका वर्तविण्यात येत असल्याने आपल्या सर्वांना अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यामुळे शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या आरोग्याबाबत अधिक दक्ष राहणे आवश्यक आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुगणालयाच्या अधिष्ठातांनी पुढील काही दिवस अधिक सजग राहून कोणताही निष्काळजीपणा होणार नाही याची काळजी घ्यावी. येत्या रविवारी होणाऱ्या वेबिनारमध्ये अधिकाधिक डॉक्टरांनी सहभागी व्हावे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या रविवारी कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील डॉक्टरांसोबत आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये सहभागी होणार आहेत. या वेबिनारमध्ये विविध विषयातील तज्ज्ञ, टास्क फोर्सचे सदस्यही सहभागी होणार असून सर्व अधिष्ठाता यांच्यासह त्या-त्या महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी या वेबिनारमध्ये सहभागी व्हावे. याशिवाय जिल्ह्यातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी यांनाही सहभागी करुन घ्यावे. धोरणाचा अभ्यास करावा सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि अतिविशेषोपचार रुग्णालये स्थापन करून वैद्यकीय सुविधात वाढ करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे वैद्यकीय महाविद्यालांमध्ये चांगली गुंतवणूक आणि तज्ज्ञ मंडळी येण्यास मदत होणार आहे. सर्व अधिष्ठाता यांनी या फायदा आपल्या महाविद्यालयाला कसा होईल याचा अभ्यास करावा.शासनामार्फत लवकरच रिक्त पदे भरण्यात येणार गेल्या जवळपास दीड वर्षांपासून कोविडमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. आता मात्र वर्ग 1 ते  वर्ग 4 मधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु असल्याने लवकरच नवीन भरती होणार आहे. वर्ग 1 आणि वर्ग 2 ची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तर वर्ग 3 ची भरती वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत होणार आहे. तर वर्ग 4 मधील पदे अधिष्ठाता यांना करार पध्दतीवर घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. लसीकरणावर भर द्यावा येणाऱ्या काळात सर्व अधिष्ठाता यांनी सर्व महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सोईसुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता, व्हेंटिलेटर्सची संख्या यांच्यासह तांत्रिक साहित्य तयार ठेवावे. रुगणालयात प्रत्यक्ष काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना संरक्षणात्मक साधने देण्याबरोबरच प्रत्येकाचे लसीकरण करुन घ्यावे. आपल्या सर्वांनाच महाराष्ट्र लवकरात लवकर कोविडमुक्त करावयाचा असून यासाठी राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी आपले योगदान द्यावे. यापुढील काळात आणखी दक्ष राहून रुग्णांची सर्व प्रकारची काळजी घेत कोविडविरोधातील युध्द जिंकण्यासाठी सज्ज व्हावे. येत्या काळातही राज्यातील अधिष्ठाता, डॉक्टर्स, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, आरोग्य कर्मचारी आपले योगदान देतील अशी अपेक्षा यावेळी मंत्री श्री. देशमुख यांनी व्यक्त केली. या बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, ऑक्सिजनचा साठा, उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर्सची संख्या, रेमीडिसीव्हीरची उपलब्धता, रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना, गरज पडल्यास अतिरिक्त डॉक्टर्सची उपलब्धता अशा विविध विषयांचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला.

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

मतदार जागृतीसाठी गणेश मंडळांसोबत उपक्रमांचे आयोजन; मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती

मुंबई, दि. 2 : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी गणेश मंडळांची क्षमता मतदार जागृतीसाठी उपयुक्त ठरेल हे लक्षात घेऊन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ हा विषय घेऊन विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. श्री. देशपांडे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, स्वीप सल्लागार दिलीप शिंदे, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅ़ड. नरेश दहिबावकर उपस्थित होते. यावेळी श्री. देशपांडे म्हणाले, लोकशाही सुदृढ, बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी कार्यक्रम प्रभावीपणे राबवणे आवश्यक आहे. निवडणुका यशस्वीपणे आयोजित करणे ही जशी महत्त्वाची बाब आहे, त्याचबरोबर या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारांचा सहभाग जास्तीत जास्त वाढावा यासाठी मतदार शिक्षण, प्रशिक्षण आवश्यक असून या बाबीकडे भारत निवडणूक आयोगाने ‘सिस्टेमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ॲण्ड इलेक्टोरल पार्टिसिपेशन’ (स्वीप) कार्यक्रमाच्या माध्यमातून लक्ष केंद्रीत केले आहे. मतदार नोंदणी आणि नोंदणी झालेल्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे या दोन महत्त्वाच्या बाबींकडे आम्ही लक्ष देत आहोत. गणेश मंडळांनी सामाजिक जाणीवेतून चांगले काम केल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत मतदार जागृतीचा चांगला संदेश जनतेपर्यंत जाऊ शकेल हे ओळखून आम्ही ‘उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ हा उपक्रम आखला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक बंधने पाळत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये ‘घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा’ आयोजित केली जाणार आहे. प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे आवश्यक आहे. हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून गणेश-मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये, नातेवाईकांमध्ये मतदार नाव नोंदणी, वगळणी यासंबंधीची जागरूकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भिडपणे मतदानाचा हक्क बजावणे आदीं विषयांवर, घरगुती गणेशोत्सव सजावटीतूनही जागृती करता येऊ शकते. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि समाजमाध्यमांवर स्पर्धेची सविस्तर नियमावली देण्यात आलेली आहे. या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत निवडणूक आयोगाचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, तसेच मतदार नाव नोंदणी आणि वगळणी यांसाठी प्रसार-प्रचार केला जाणार आहे. कोरोनाचे नियम पाळून गणेश मंडळाच्या मंडपात आणि ऑनलाइन माध्यमांद्वारेही ही जागृती केली जाणार आहे. दि. 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या पुनरीक्षणांचा कार्यक्रम दि. 1 नोव्हेंबर 2021 पासून सुरू होत आहे. त्यामध्येही अधिकाधिक नवमतदारांची नोंदणी व्हावी याकडे लक्ष केंद्रित करण्यात येत आहे, असेही श्री. देशपांडे म्हणाले. 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या नवमतदारांची नोंदणी महत्त्वाची बाब असून त्यासाठी राज्यातील विद्यापीठांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांमध्ये मतदान प्रक्रियेची जागृती करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये येत्या शिक्षक दिनी दि. 5 सप्टेंबर रोजी लोकशाही मूल्यांची रुजवण आणि शिक्षकांची भूमिका या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशीही माहिती श्री. देशपांडे यांनी दिली.

नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

डॉक्टर आपल्या दारी’ संकल्पनेतून ग्रामीण भागात रुग्णसेवा..!* – डॉ. आशिष देशमुख   ● काटोल-नरखेड तालुक्यात नि:शुल्क रोगनिदान, रूग्णभरती व रक्तदान शिबिरांचे आयोजन. ●खैरगाव येथे ६०५ रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ.

वार्ताहर-कोंढाळी      “डॉक्टर आपल्या दारी या संकल्पनेतून ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा देण्याचा आपला प्रयत्न असून लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूरच्या…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत महाराष्ट्रात २४ लाख लाभार्थ्यांची नोंद

मुंबई, दि. १ – माता व बालमृत्यूदर कमी करण्याबरोबरच माता आणि बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री…