महाराष्ट्र हेडलाइन

विधानपरिषद प्रश्नोत्तरे राज्यातील कुठल्याही महानगरपालिका, नगरपालिकांना विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

Summary

मुंबई, दि. 3 : मूलभूत सोयी सुविधा योजनेअंतर्गत राज्यातील कुठल्याही महानगरपालिका व नगरपालिकांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली. नागपूर महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधा योजनेअंतर्गत निधी अप्राप्त असल्याबाबत विधान परिषद सदस्य […]

मुंबई, दि. 3 : मूलभूत सोयी सुविधा योजनेअंतर्गत राज्यातील कुठल्याही महानगरपालिका व नगरपालिकांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली.

नागपूर महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधा योजनेअंतर्गत निधी अप्राप्त असल्याबाबत विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते विधान परिषदेत बोलत होते.

कोविड-19 च्या संकटामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आला होता तसेच राज्याच्या उत्पन्नावरही मर्यादा आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर प्राधान्यक्रमाने विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. नागपूर महानगरपालिकेत कुठलीही विकासकामे थांबविण्यासाठी नगरविकास विभागाने आदेश दिलेला नाही. ज्या कामांचे कार्यादेश निघाले आहेत ती कामे थांबणार नाहीत आणि त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी माहिती मंत्री श्री.शिंदे यांनी दिली.

कोकणातील ज्या नगरपालिकांची स्थिती बेताची आहे, त्यांना मूलभूत सोयी – सुविधांसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी  एका उप प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, सदस्य डॉ. परिणय फुके यांनी सहभाग घेतला .

संकलन
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *