MPSC परिक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने फेरविचार करावा- आकाश गजबे
Summary
राज्यसेवा परीक्षेबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. काटोल-तालुका प्रतिनीधी कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी मार्च २०२० ची राज्यसेवेची पूर्वपरीक्षा एप्रिल, सप्टेंबर अशी दोन वेळा पुढे ढकलली होती. परत जानेवारी महिन्यात 14 मार्च 2021 ची तारीख जाहीर केल्यामुळे लाखो विद्यार्थी पूर्णवेळ तयारी […]
राज्यसेवा परीक्षेबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.
काटोल-तालुका प्रतिनीधी
कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी मार्च २०२० ची राज्यसेवेची पूर्वपरीक्षा एप्रिल, सप्टेंबर अशी दोन वेळा पुढे ढकलली होती. परत जानेवारी महिन्यात 14 मार्च 2021 ची तारीख जाहीर केल्यामुळे लाखो विद्यार्थी पूर्णवेळ तयारी करत आहेत.
आता फक्त ३ दिवसावर राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आली असताना ती पुढे ढकलण्याचा महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाने घेतलेला निर्णय अतिशय संवेदनशील आहे आर्थिक कुचंबणा व वाढत्या वयाकडे लक्ष न देता लाखो गरीब युवा विद्यार्थी कौटुंबिक अपेक्षा आणि सामाजिक तणावाच्या ओझ्याखाली या परीक्षेची तयारी करतात. कित्येक उमेदवारांची वयोमर्यादा परीक्षा न देताच संपत आहे.
बस ट्रेन कार्यालय व उद्योग सुरळीत सुरु असताना कोरोनाचे कारण देऊन अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काहीही साध्य होणार नाही. विद्यार्थी हे अतिशय नाजूक मानसिकतेत असून अशा अचानक घेतलेल्या निर्णयाचे पडसाद अनपेक्षित आणि चुकीच्या पद्धतीने उमटू शकतात. त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेता राज्यसेवेची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात बाबत सरकारने यावर तातडीने फेरविचार करून निर्णय घ्यावा, असे निवेदन मुख्यमंत्री यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नागपूर जिल्हा ग्रामीणच्या वतीने जिल्हाध्यक्ष आकाश गजबे यांनी दिले.
दुर्गाप्रसाद पांडे
कोंढाळी