CAG कॅग अहवालानुसार शासनाने हिशोब द्यावा- मोहनभाऊ पंचभाई
Summary
प्रतिनिधी, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे राज्यपाल महाराष्ट्र राज्य व मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत१५जुलै ला निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्प अधिवेशन पार पडले व या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला. या अहवालातून महाभ्रष्ट महायुति सरकारने राज्याची […]
प्रतिनिधी,
भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे राज्यपाल महाराष्ट्र राज्य व मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत१५जुलै ला निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्प अधिवेशन पार पडले व या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला. या अहवालातून महाभ्रष्ट महायुति सरकारने राज्याची मोठ्या प्रमाणात अधोगती केल्याचे दिसून आले. दरडोई उत्पन्नात आघाडीवर असणारा महाराष्ट्र या महायुती सरकारच्या काळात सहाव्या क्रमांकावर फेकल्या गेला आहे. कृषी क्षेत्रात राज्याची मोठी पिछेहाट झाली असून राज्यावर ८ लाख कोटी रूपयांच्या कर्जाचा डोंगर उभा केला आहे.
दिनांक १२ जुलै रोजी सरकारने विधीमंडळासमोर CAG कॅगचा अहवाल मांडला. त्यातून राज्य सरकारच्या गलथान कारभाराचे आर्थिक बेसिस्तीचे भयाण वास्तव समोर आले आहे. टेंडर घ्या, कमीशन द्या. या धोरणानुसार कंत्राटदार मित्रांचे खिसे भरण्यासाठी हजारो कोटी रूपयाचे प्रकल्प सुरू केले. पण त्यातून राज्याचे भले होण्यापेक्षा सरकारच्या मित्रांचेच भले झाले. राज्यात एकूण ११० सार्वजनिक उपक्रम महामंडळे व कंपन्या आहेत. यातील ४१ महामंडळाचा संचित तोटा ५० हजार कोटींवर गेला आहे. एम.एम.आर.डी.ए. सारखा नफ्यातील उपक्रम कर्जात डुबला आहे. हा सर्व पैसा महाराष्ट्रातील जनतेच्या कष्टाचा पैसा आहे. पण हा पैसा भ्रष्ट मंत्री, अधिकारी आणि ठेकेदारांच्या खिशात जात आहे. ही जनतेची लुट आहे असे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी सांगितले.
तरी पण कृपया महोदय, महामंडळांना दिलेले पैसे कुठे खर्च होत आहे? त्यातून काय कामे झाली? याचा हिशोब द्यावा. असे निवेदन जिल्हा धिकारी साहेब यांना देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, जिया पटेल महासचिव प्रदेश काँग्रेस कमिटी, सुभाष आजबले वरिष्ठ पदाधिकारी, सागर गणवीर माजी जिल्हाध्यक्ष, प्यारेलाल वाघमारे तालुका अध्यक्ष भंडारा, राजेश हटवार अध्यक्ष मोहाडी तालुका , प्रशांत देशकर शहर अध्यक्ष, धनराज साठवणे, राजू निर्वान, प्रमोद तितिरमारे, अमर भाऊ रगडे, शंकर राऊत, राजेश ठाकूर, सुरेस ब्राम्हणकर, मनोज बागडे, राजकपूर राऊत, स्वाती हेडाऊ, नम्रता बागडे, भाऊ कातोरे, गोविंदा हुकरे, अरुण गडकरी, केशव शेंडे, सुनील खुखदेवे, स्वप्नील चवळे, प्रकास पचारे, महेश नान्हे, मनोहर मेश्राम, राकेश बिसने, नाहिद परवेज, कमलाकर रायपूरकर, व अनेक कार्यकर्त उपस्थित होते.
