गडचिरोली महाराष्ट्र हेडलाइन

_संत गंगा माऊली पालखीचे गडचिरोलीत आगमन; माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी घेतले दर्शन…._

Summary

गडचिरोली | दि. ०२ जुलै २०२५ गडचिरोलीत आज भक्तिरसात न्हालेला एक विशेष दिवस ठरला. श्री गुरुमाऊली गंगामाई अध्यात्मिक मंडळ, चंद्रपूर यांच्यातर्फे दरवर्षीची परंपरा कायम राखत पंढरपूरला निघणारी संत गंगा माऊलीची पालखी यंदाही भक्तिपूर्ण वातावरणात, परमपूज्य श्री लक्ष्मणदासजी काळे महाराज यांच्या […]

गडचिरोली | दि. ०२ जुलै २०२५

गडचिरोलीत आज भक्तिरसात न्हालेला एक विशेष दिवस ठरला. श्री गुरुमाऊली गंगामाई अध्यात्मिक मंडळ, चंद्रपूर यांच्यातर्फे दरवर्षीची परंपरा कायम राखत पंढरपूरला निघणारी संत गंगा माऊलीची पालखी यंदाही भक्तिपूर्ण वातावरणात, परमपूज्य श्री लक्ष्मणदासजी काळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली, गडचिरोलीत दाखल झाली.

यावेळी शांतीराज फूड्स प्रायव्हेट लिमिटेड – ट्रीट आईस्क्रीम फॅक्टरी, MIDC, गडचिरोली येथील प्रांगणात पालखीचे दर्शन झाले. यावेळी परिसरात भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयघोषात गंगा माऊलीचे दर्शन घेतले.

या प्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी खास उपस्थिती दर्शवून पालखीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भावना व्यक्त करत म्हटले, “ही केवळ पालखी नाही, ही संतांच्या परंपरेची साक्ष आहे. आज दर्शन घेण्याचे व पालखी खांद्यावर धरल्याचे भाग्य मिळाले हे माझे सौभाग्य आहे.”

या कार्यक्रमावेळी अमोलजी,रामभाऊ,सचिन,पुजाताई,नितिन,निलेश यासह चकनलवार परिवार आणि परमपूज्य लक्ष्मणदासजी काळे महाराज यांच्यासह प्रशांत तम्मेवार सर,संजय नर्लावार, गिरीश कुकडपवार,नंदकिशोर गुंडपवार,संतोष संगनवार,नंदु दंडमवार,अजय आईचवार, उपस्थित होते. वातावरण भक्तिरसात भरलेले होते. स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांनी जयघोषाच्या गजरात संत गंगामाऊली पालखीचे स्वागत केले.

पालखी सोहळा हा केवळ धार्मिक विधी नसून, तो समाजाला अध्यात्मिक एकात्मतेकडे नेणारा एक प्रवास आहे. अशा परंपरांचे जतन आणि संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे भाव माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी बोलून दाखवले.

पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
गडचिरोली चामोर्शी
प्रतिनिधि
गजानन पुराम
मो. 7057785181

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *