_”संकल्प ते सिद्धी” कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद..! मोदी सरकारची यशस्वी वाटचाल. मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांचे कार्यशाळेला प्रतिपादन_. मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त भाजपा गडचिरोलीची जिल्हास्तरीय कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न
Summary
गडचिरोली, दि. ९ जून २०२५ – पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या यशस्वी वाटचालीनिमित्त भारतीय जनता पार्टी, जिल्हा गडचिरोलीतर्फे “संकल्प ते सिद्धी” या विशेष जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन आज गडचिरोली येथील पत्रकार भवनामध्ये करण्यात आले. कार्यशाळेची सुरुवात जननायक […]

गडचिरोली, दि. ९ जून २०२५ –
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या यशस्वी वाटचालीनिमित्त भारतीय जनता पार्टी, जिल्हा गडचिरोलीतर्फे “संकल्प ते सिद्धी” या विशेष जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन आज गडचिरोली येथील पत्रकार भवनामध्ये करण्यात आले.
कार्यशाळेची सुरुवात जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त दीपप्रज्वलन व अभिवादनाने झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते होते. त्यांच्या सोबत प्रमुख उपस्थितीत भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, माजी आमदार डॉ. देवरावजी होळी,माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, कि.मो.प्र.सचिव नेते रमेश भुरसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, समन्वयक प्रमोदजी पिपरे,महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गिताताई हिंगे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल जी पोहनकर, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, तालुकाध्यक्ष दत्तुभाऊ सुत्रपवार, काम.आ. प्र.सचिव गोवर्धन चव्हाण, ज्येष्ठ नेते सुधाकर येंगदलवार,विलास पा.भांडेकर,मुक्तेश्वर काटवे, अनिल करपे,विनोद देवोजवार, तसेच या कार्यशाळेला जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, मंडळ संयोजक, तालुकास्तरावरील कार्यकर्ते, महिला व युवा मोर्च्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या कार्यशाळेला मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी बोलतांना म्हणाले “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेवा, सुशासन व गरिब कल्याण या त्रिसूत्रीच्या माध्यमातून भारताला नव्या उंचीवर नेलं आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या मूलमंत्रातून संपूर्ण देशात नवचैतन्य निर्माण झालं आहे. योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे कार्य या सरकारने केलं, ” असे मा.खा. डॉ.अशोकजी नेते यांनी आवर्जून सांगितले.
काँग्रेसच्या ६० वर्षांची पोकळी – मोदींच्या ११ वर्षांची सिद्धी!
या कार्यशाळेत पुढे बोलताना मा.खा.डॉ.अशोकजी नेते म्हणाले “काँग्रेसने ६०-६५ वर्षं देशावर राज्य केलं, मात्र जे काम तेवढ्या काळात होऊ शकले नाही, ते केवळ ११ वर्षांत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झालं. जम्मू-कश्मीर मधून कलम ३७० हटवणं, तीन तलाकचा , सर्जिकल स्ट्राइक, ‘ऑपरेशन सिंदूर’, राम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय, आणि कोरोनासारख्या महाभयानक संकटात देशाला सुरक्षित ठेवण्याचं काम — हे सर्व यश मोदींनी आपल्या मजबूत इच्छाशक्तीने साध्य केलं आहे.”
तसेच भारताची अर्थव्यवस्था जी पूर्वी बळकट नव्हती, ती आज जागतिक स्तरावर अग्रगण्य बनली आहे. देशाची प्रतिमा बळकट करण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीनी केले. हे श्रेयही मोदी सरकारच्या धोरणांना दिलं गेलं.या कार्यशाळेद्वारे केंद्र सरकारच्या विविध योजना, कार्यपद्धती, तसेच आगामी काळात राबवायच्या जनजागृती उपक्रमांबाबत या कार्यशाळेचा उपयोग भाजपाच्या संघटनात्मक बळकटीस निश्चितच होणार आहे.असे प्रतिपादन मा.खा.डॉ.अशोकजी नेते यांनी आयोजित कार्यशाळेला केले.
“संकल्प ते सिद्धी” ही कार्यशाळा केवळ एक आयोजन नव्हे, तर पुढील कार्यप्रवृत्तींसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास मंचावरिल पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.