_गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल 11 व 12 ऑक्टोंबर रोजी गडचिरोली दौऱ्यावर_ _जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे व राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. हर्ष चव्हाण हे ही राहणार उपस्थित_
गडचिरोली : महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी सोमवार दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी दुपारी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. मंगळवार दिनांक 12 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी एमआयडीसी गडचिरोली येथे सी आर पी एफ ग्राउंड वर सायकल रॅली काढली जाणार आहे त्या ठिकाणी मा.महामहीम राज्यपाल महोदय रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करणार आहे. त्याच दिवशी सकाळी ते गोंडवाना विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारंभाच्या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहे.
*_राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोगाचे अध्यक्ष मा. हर्ष चव्हाण दीक्षान्त समारंभाला राहणार उपस्थित*
राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोगाचे अध्यक्ष माननीय हर्ष चव्हाण हे सुद्धा दिनांक 12 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या सोहळ्यास उपस्थित राहणार आहे. त्यानंतर दुपारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली मधील अधिकाऱ्यांसोबत त्यांची कार्यालय बैठक होणार आहे.
*_गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे हे सुद्धा राहणार उपस्थित_*
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे हे सोमवार दिनांक 11 ऑक्टोंबर 2021 रोजी सायंकाळी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. मंगळवार दिनांक 12 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी, एमआय डि सी गडचिरोली येथील सी आर पी एफ ग्राउंड वर मा. राज्यपालांच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहे. तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या नवव्या दीक्षान्त समारंभाला ही ते उपस्थित राहणार आहे. दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ऑक्सिजन एल एम ओ.प्लांट आणि पी एस ए प्लांट च्या उद्घाटन सोहळ्यास तसेच रुग्णवाहिका वाटप कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहे. त्यानंतर पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सामान्य रुग्णालय येथे चार वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी प्रा. शेषराव येलेकर