जाहिरात नाही तर बातमी नाही…, ग्रामीण पञकारांची खसता हालत….,जाहिरात हेच पञकारांच्या उपजिवीकेचा आधार

ग्रामीण भागात पञकारीता करणे खुप जिकरीचे झाले असुन आज हि अनेक जणांना असा गैरसमज आहे कि पञकारांना खुप काही मिळते म्हणून….मिञ हो आम्ही तुमच्या बातम्या कव्हर करण्यासाठी अनेकवेळा घरची असो कि इतर म्हत्वाचीं कामे असो ती बाजुला ठेवुन दिवसभर तुमच्या बातमीचे वार्तांकन करतो…असा प्रसंग एक वेळ नाही तर वर्षातुन अनेक वेळा येतो. शिवाय शेतकरी, व्यापारी, मजुर, सर्वसामान्य नागरिक यांच्या अनेक समस्यांना निर्भिड पणे आपापल्या दैनिकात प्रसिध्दी देवुन वाचा फोडतो. जो पर्यंत निपटारा होत नाही तो पर्यंत बातमी लावुन धरतो. हे सर्व करीत असतांना शेवटी दैनिक चालवण्यासाठी हि पैसा लागतो त्यामुळे दैनिकाची वेळोवेळी आपल्या प्रतिनिधी मार्फत काही तरी जाहिराती मिळाव्या म्हणून नेहमी तगादा असतो. या जाहिराती साठी आम्ही जर वर्षातुन एखाद दोन वेळेस दिवाळी,ईद, जयंती,सण किंवा वाढदिवसाच्या जाहिराती ची मागणी केली तर अनेक जण अगोदर फोन घेतात मात्र जाहिराती विषय बोललो कि फोन देखील उचलत नाही. तुम्हीच सांगा बातम्यांसाठी आम्हाला वेळोवेळी निमंत्रण देतात, आमची बातमी चांगली घ्या म्हणतात मग जर आम्ही जाहिरात मागीतली तर का देत नाही. तुम्ही जाहिरात दिली नाही तर आम्ही काम कसे करावे..आम्हाला कुटुंब कबिला चालविण्यासाठी दुसरा कोणता पर्याय आहे. जर तुम्ही बातम्यांची अपेक्षा करता तर जाहिरात पण द्या हो…शेवटी आम्हाला ही कुटुंब आहे..त्यांची देखील आमच्यावर जबाबदारी आहे.
*पञकार मिञांनी हि आता एकञ येवुन जाहिरात नाही तर बातमी नाही यावर ठाम असणे गरजेचे आहे, पञकार मीञांनो आपली जबाबदारी ओळखा, नुसती पञकारीता करण्यात आता काही राहिले नाही,या सोबत दुसरे काही तरी व्यवसाय करा, नसता आपली मुले आपल्याला कधी ही माफ करणार नाहीत, जी संस्था,जो विभाग,जो राजकारणी जाहिरात देत नाहीत त्यांच्या मागेपुढे फिरणे आणि त्यांना प्रसिद्धी देणे बंद करा. तरच जाहिराती मिळतील नसता एक दिवस आपल्यालाच रस्त्यावर भिक मागावी लागेल, त्यामुळे जो जाहिरात देतो त्यांच्याच बातम्या करा आपला आमुल्य वेळ वाया घालु नका, कारण गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही.
तुमचाच पञकार मिञ
शेख चाँद शेख यासीन सिल्लोड
************************************************************