5 एप्रिल ला सम्राट अशोक जयंती प्रथमच होणार साजरी त्रिरत्न बुद्ध विहार लाखांदूर येथे

लाखांदूर:- लाखांदूर तालुक्यातील सर्व बौद्ध बांधवांना कळविण्यात येथे कि, दिनांक 5एप्रिल ला सम्राट अशोक यांची जयंती त्रिरत्न बुद्ध विहार येथे साजरी करण्यात येत आहे.
14ऑक्टोम्बर 1956 रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजातील लाखों दलितांना धम्म दीक्षा दिली. त्यामुळे 14 एप्रिलला त्यांच्या जन्मदिनी भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र प्रियदर्शि राजा सम्राट अशोक यांनी संपूर्ण जगात 84 हजार बौद्ध स्तुप बांधून बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार केला. मात्र त्यांच्या बद्दलची जागरुकता व अशोकांनी बांधलेल्या स्तूपांची सरंक्षण, संवर्धन व सुरक्षितता भारतात होऊ शकली नाही. भारतात अनेक ठिकाणी हि पुरातत्त्व सर्वेक्षणानुसार ती बौद्ध स्तुप आहेत. राजा सम्राट अशोक सत्य, अहिंसा, प्रेम, सहिष्णुता आणि शाकाहारी जीवणप्रणिती यांचे थोर पुरस्कर्ते होते. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांच्या विशाल साम्राज्यात धर्माचा प्रचार केला. त्यांनी आपल्या प्रजाजनांना आणि प्रशासकीय अधिकार्यांना आपल्या शिलालेखातून काही राजाज्ञा दिलेल्या आहेत. त्यांनी कलिंग देश जिंकल्यानंतर, त्यांनी सशस्त्र विजयाचा त्याग केला आणि ” धर्माने विजय ” असे धोरण स्वीकारले होते.
मोठ्या संख्येने स्तुप स्थापन केले.
त्यांनी तिसऱ्या बौद्ध परिषदेचे सरंक्षण केले. त्यांनी बौद्ध धर्मप्रचारकांना पाठिंबा दिला. त्यांनी संघाला उदारपणे देणग्या दिल्या आहेत. याची जागूती व्हावी या करीता दिनांक 5 एप्रिल 2025 रोज शनिवार ला त्रिरत्न बुद्ध विहार लाखांदूर येथे बुद्धिष्ट समाज संघर्ष समिती व समता सैनिक दल लाखांदूर यांच्या वतीने प्रियदर्शि राजा सम्राट अशोक यांची 2329 वी जयंती साजरी करण्यात येत आहे. तरी लाखांदूर तालुक्यातील सर्व बौद्ध बांधवांनी, समविचारी संघटना, उपासक/ उपासिका यांनी जास्तीत जास्त संख्याने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समिती कडून करण्यात आले आहे.