328 निवडणूक केंद्रात आज (रविवारी) आधार जोडणी अभियान मतदारांनी (आज) 11सप्टेबर रोजी बुथकेंद्रावर बीएलओशी संपर्क साधण्याचे आवाहन
Summary
कोंढाळी-वार्ताहर आज 11 सप्टेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यामधील एकूण 328 निवडणूक केंद्रामध्ये निवडणूक कार्ड सोबत आधार जोडणी अभियानासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. याशिवाय नव मतदारांना नोंदणी करणे, नाव वगळणे, यासाठी सुद्धा प्रत्येक केंद्रावर कर्मचारी रविवारच्या दिवशी उपस्थित राहणार आहेत. […]
कोंढाळी-वार्ताहर
आज 11 सप्टेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यामधील एकूण 328 निवडणूक केंद्रामध्ये निवडणूक कार्ड सोबत आधार जोडणी अभियानासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. याशिवाय नव मतदारांना नोंदणी करणे, नाव वगळणे, यासाठी सुद्धा प्रत्येक केंद्रावर कर्मचारी रविवारच्या दिवशी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन काटोल उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, तहसीलदार अजय चरडे यांनी केले आहे.
लोकशाही यंत्रणेत जबाबदार मतदार म्हणून आपल्या आधार कार्डची जोडणी निवडणूक कार्ड सोबत करणे आवश्यक आहे.याशिवाय निवडणूक यादीमध्ये आपले नाव तपासून घेणे, तसेच नव्याने नाव टाकणे, वगळणे यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. काटोल विधान सभा मतदार संघातील प्रत्येक निवडणूक केंद्रावर तसेच प्रत्येक गावातील शाळांमध्ये निवडणूक केंद्रांवर ही मोहीम असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांचेव्दारा निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम, 2021 नुसार मतदार याद्यातील तपशीलाशी जोडण्याकरीता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून एच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करणे बाबत कार्यक्रम घोषित केलेला आहे.
मतदार ओळखपत्राशी आधार क्रमांकाची जोडणीचे काम दि. 01.08.2022 पासून सुरु झालेले आहे. काटोल विधानसभा मतदार संघा अंतर्गत भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानूसार दि. 11.09.2022 (रविवार) रोजी मतदार ओळखपत्राशी आधार जोडणी कार्यक्रमा बाबत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमे अंतर्गत काटोल तालुक्यातील एकूण 328 मतदान केंद्रावर नमुना 6ब, नमुना क्र. 6, 7, 8 सह मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) उपस्थित राहणार आहे मतदार यादीत नाव असलेल्या मतदारास आपले आधार लिंक करायचे असल्यास सदर मतदाराने नमुना 6 ब भरुन तसेच ज्या पात्र मतदारांचे मतदार यादीत नाव नाही अशा मतदारांनी नमुना क्र. 6, ज्यांना नाव वगळायचे आहेत त्यांनी नमुना 7 व ज्यांच्या नावामध्ये दुरुस्ती आहे किंवा ज्यांना पत्यामध्ये बदल करायचा आहे त्यांनी नमुना 8 आवश्यक कागदपत्रासह जवळच्या मतदान केंद्रावर सादर करावा किंवा ऑनलाईन नमुना 6 ब, नमुना 6, 7 व 8 भरायचा असल्यास nvsp.in, voterportal, voter helpline app या माध्यमांचा वापर करावा.मतदारांकडे आधार क्रमांक नसल्यास अर्ज क्र. 6 ब मध्ये दर्शविलेल्या 11 पर्यायी कागदपत्रापैकी एक कागदपत्र सादर करता येईल उदा. पॅनकार्ड, फोटोसहीत किसान पासबुक, पासपोर्ट, इपिक कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटोसहीत पेन्शन कागदपत्रे, केंद्र/राज्य शासन कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र, समाजिक न्याय विभागातील ओळखपत्र नमुना क्र. 6ब सह देता येईल. अशी माहीती काटोल विधान सभा निवडनूक काटोल तहसील सह निवडनूक अधिकारी एन टी टिपरे, भागवत पाटील, राजेंद्र जंवजाळ, रूपाली पोळ यांनी केले आहे.