3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कढोली बु मध्ये पहिल्यांदाच घेतलेला सावित्रीबाई फुले, फातिमा शेख व राजमाता जिजाऊ जयंती 2023
Summary
3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कढोली बु मध्ये पहिल्यांदाच घेतलेला सावित्रीबाई फुले, फातिमा शेख व राजमाता जिजाऊ जयंती 2023 सावित्री उत्सव निमित्ताने गावाचा जो सहभाग नी सहकार्य लाभले त्याबद्दल सर्वांचे खूप खूप अभिनंदन. ज्ञानज्योत रॅली निघणार म्हणून ठरलेल्या नियोजनाप्रमाणे गावकऱ्यांनी […]

3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कढोली बु मध्ये पहिल्यांदाच घेतलेला सावित्रीबाई फुले, फातिमा शेख व राजमाता जिजाऊ जयंती 2023 सावित्री उत्सव निमित्ताने गावाचा जो सहभाग नी सहकार्य लाभले त्याबद्दल सर्वांचे खूप खूप अभिनंदन. ज्ञानज्योत रॅली निघणार म्हणून ठरलेल्या नियोजनाप्रमाणे गावकऱ्यांनी केलेली स्वच्छता अभियान मोहीम ,घरोघरी दारापुढे काढलेली रांगोळी आणि त्यात सजलेल्या माझ्या भगिनी महिलावर्ग बघून खूपच आनंद वाटला कधी नव्हे असे गाव सजले,तोरण लावून चौक सुशोभित करण्यात आले. त्यात भारत देशात आदर्श निर्माण करणाऱ्या महिलांचे फोटोचे पूजन मन भारावून टाकणारे होते थोर महिलांचे विचार नि कार्य ,समाज प्रबोधन, महिला प्रबोधन गाव स्वच्छता, सांस्कृतिक कार्यक्रम, भोजनदान,यासारख्या चांगले कार्य आपल्याला करता आले आपले सहकार्य खूप मोलाचे होते ,गाव करी ते राव ना करी.एक छोटेसे विचाररूपी बीज पेरले आणि तुमच्या सहकार्याने ते बहरले ,सर्व महिला सजलेली व प्रफुल्लित बघुन सर्वात जास्त आनंद झाला,किमान एक दिवस त्या केवळ स्वतःसाठी जगल्या ,अपेक्षा करते आपला गाव असाच सुंदर, स्वच्छ, आणि महापुरुषांच्या विचाराने प्रेरीत झालेला असावा ,नवयुवक बालक यांची आदर्श पिढी निर्माण व्हावी,गावाची प्रगतीपथाकडे वाटचाल व्हावी. या कार्यक्रमाला सर्व गावकरी महीला ,युवक, विद्यार्थिनी नी सहभाग दर्शविला व सावित्री उत्सव यशस्वी केला. त्याबद्दल सर्वांचे आभार.