भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

पोलीस अधीक्षक कार्यालय भंडारा येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण

Summary

प्रतिनिधी भंडारा   भंडारा:- आज दिनांक ०१-०५-२०२३ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय भंडारा येथे मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री रोहित मतांनी व श्रीमती रश्मिता राव सहाय्यक पोलीस अधीक्षक तुमसर, पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. विजय डोळस यांचे उपस्थितीत पोलीस अधीक्षक […]

प्रतिनिधी भंडारा
  भंडारा:- आज दिनांक ०१-०५-२०२३ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय भंडारा येथे मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री रोहित मतांनी व श्रीमती रश्मिता राव सहाय्यक पोलीस अधीक्षक तुमसर, पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. विजय डोळस यांचे उपस्थितीत पोलीस अधीक्षक भंडारा येथे श्री. लोहित मतांनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली. मा. पोलीस अधीक्षक यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या,
यावेळी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनीय प्रशासनीय सेवेबद्दल भंडारा जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पोलीस अधीक्षक भंडारा श्री. लोहित मतांनी, श्रीमती रश्मिता राव सहायक पोलीस अधीक्षक तुमसर, पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. विजय डोळस यांचे उपस्थितीत सहाय्यक फौजदार सय्यद दुर्रानी, पो. हवा. राजेश ठाकरे सन्मानचिन्हे व प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आले.
यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमाला यावेळी कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक श्री. चिंचोळकर स्थानिक गुन्हे शाखा भंडारा, श्री बोरकर जीवीशा भंडारा, पोलीस निरीक्षक श्री बैसाणे वानिशा भंडारा, पोलीस निरीक्षक श्री पाटील मोटार परिवहन विभाग भंडारा, सहायक पोलीस निरीक्षक मत्तामी, सहायक पोलीस निरीक्षक गावंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री देशमुख, राखीव पोलीस निरीक्षक श्री चौधरी, पोलीस उपनिरीक्षक रमाकांत दीक्षित, आर.सी.पी., क्यू. आर.टी. मुख्यालय संपूर्ण ऑफिस स्टाफ, पोलीस शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *