वरठी येथे गांजा विक्रीचा व्यवसाय बहरला. शाळा कॉलेज चे विद्यार्थी गांजा व्यसनाच्या विळख्यात. पॅरोल वर सुटणारे कैदी म्हणताहेत गांजा आहे महादेवाचा प्रसाद

प्रतिनिधी वरठी
वरठी पोलिस स्टेशन अंतर्गत पॅरोल वर सुटणारे कैदी हे गांजा व्यवसाय करीत असून शाळा कॉलेज चे विद्यार्थी हे व्यसनाधीन झालेले आहेत. महादेवाचा प्रसाद असल्याचे सांगून गांजा विक्री व्यवसायाला उधाण आणल्या जात आहे.
पहिल्यांदा महादेवाचा प्रसाद हा मोफत मिळतो.नंतर गांजाची लत लागल्यावर पैसे देउन ते विद्यार्थ्यांना खरेदी करावे लागते. प्रस्तुत गांजा विक्री पॅरोल कैदी यांच्याजवळ धारदार हत्यारे तसेच बंदुका सुद्धा आहेत. यांचे खूप मोठे रॅकेट असून विद्यार्थ्यांचे अभ्यासातील मन भटकले जात आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रेम प्रकरण चालू असून गांजा शौकीन विद्यार्थी स्वतःच्या प्रेमिकांना सुद्धा गांजाच्या बदल्यात गांजा व्यावसायिक पॅरोल कैद्यांच्या हवाले करून देत आहेत व त्यातच ब्लॅकमेलिंग चा धंदा सुद्धा जोमात सुरू आहे. प्रस्तुत गांजा व्यवसायावर वरठी पोलिस स्टेशन चे नवनियुक्त ठाणेदार अभिजित पाटील साहेबांनी लक्ष देऊन कार्यवाही करणे हे अपेक्षित आहे.
क्रमशः