24 ऑक्टो.रोजी नागपूर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाची सभा
जिल्हा नागपुर वार्ता:- राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी व संलग्णीत ओबीसी संघटनाच्या व जातीय संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा 24 ऑक्टोंबर रोज शनिवार ला नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी , इतर समविचारी ओबीसी संघटनांचे पदाधिकारी तसेच ओबीसी मध्ये मोडणाऱ्या सर्व जात संघटनांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्र व महाराष्ट्र शासन, अनेक वर्षापासून 52 टक्के असलेल्या ओबीसी समाजावर सतत अन्याय करीत असून समाजाच्या मागण्यांवर निर्णय घेत नाही. संविधानाच्या कलम 340 नुसार जे अधिकार व सुविधा ओबीसी समाजाला मिळाला पाहिजे ते अजून पर्यंत केंद्र व पुरोगामी महाराष्ट्रात राज्य सरकाराने दिलेल्या नाहीत. या विरोधात आंदोलनाची भूमिका ठरविण्या बाबत राज्यातील ओबीसी समाजाच्या विविध संघटना तसेच जातीय संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा शनिवार दिनांक 24 ऑक्टोंबर 2020 रोजी सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रिसर्च पावनभूमी सोमलवाडा वर्धा रोड नागपूर ( तायवाडे सरांच्या घराजवळ ) दुपारी १ वाजता* आयोजित केलेली आहे, सभेच्या अध्यक्षस्थाही राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे राहतील.
सभेत महाराष्ट्र राज्यासी संबंधित व केंद्र सरकारसी संबंधित मागण्यांवर विचार विनिमय करून आंदोलनाची दिशा ठरविली जाईल.
महाराष्ट्र शासनासी संबंधित व केंद्र शासनासी संबंधित प्रश्न व मागण्या सोबत पाठवीत आहे याव्यतिरिक्त कुठल्या समस्या व प्रश्ण समाविष्ट करावयाचे असल्यास सभेत नमूद करावे त्यांच्या समावेश करण्यात येईल.
सदर सभेस राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी सलंगीत ओबीसी संघटनांचे व जातीय संघटनांच्या पदाधिकारी, हितचिंतक व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे , मीटिंग मधे येताना मास लाउन यावे ही विनंती
….विनीत….
सचिन राजूरकर
महासचिव
राष्ट्रीय ओबीसी महासंघ