221 महिला पुरुषांनी रक्तदान करून नामदार नितीन गडकरी यांचा वाढदिवस साजरा केला
Summary
कोंढाळी -प्रतिनिधी-दुर्गाप्रसाद पांडे कोरोना काळात सर्वसामान्य लोकांकरिता धाऊन येणारा देवदूत म्हणजे नामदार नितीन गडकरी . केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्त व कोरोना रुग्णांना रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी आज26मे रोजी कोंढाळी येथे भारतीय जनता पार्टी कोंढाळी सर्कल च्या वतीने डाॅ. […]
कोंढाळी -प्रतिनिधी-दुर्गाप्रसाद पांडे
कोरोना काळात सर्वसामान्य लोकांकरिता धाऊन येणारा देवदूत म्हणजे नामदार नितीन गडकरी .
केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्त व कोरोना रुग्णांना रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी आज26मे रोजी कोंढाळी येथे भारतीय जनता पार्टी कोंढाळी सर्कल च्या वतीने डाॅ. हेडगेवार रक्तपेटी च्या माध्यामातून भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. कोंढाळी जिल्हा परिषद सदस्या
सौ पुष्पाताई शेषराव चाफले व शहर अध्यक्ष बालकीसन पालीवाल तथा पं.स. सदस्य लताताई धारपूरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून रक्तदान कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या रक्तदान शिबिरात 221 महिला पुरूषांनी रक्तदान केले. यावेळेस 40 टक्के महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन रक्तदान केले. महिलांची लक्षणिक उपस्थिती यावेळेस पाहण्याजोगी होती. हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी भाजपा
ग्रामविकास आघाडी
जिल्हा महामंत्री प्रमोद शेषराव चाफले,
ग्रा. पं. सदस्य भीमराव गोंडाणे, नितीन देवतळे,
सौ कविता झाडे, सौ ज्योत्स्ना धोटे, मनोज गोरे, मुन्नासिंग शेंगर,
प्रमोद धारपूरे, आकाश जैन,
अंकित पालीवाल, गोविंदा गजबे, वैभव जयपुरकर, प्रमोद वासुदेवराव चाफले, लखन तेलंगे, शुभम कंगाली, मनोज परतेती, तथा भाजपाचे कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.