*22 गो वंशीय प्रजातीच्या जनावरांना नवीन कामठी पोलिसांकडून जीवनदान… एकूण.13 लाख30 रुपयांचा मुद्देमाल जप्त*
नागपूर कामठी 24 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता दरम्यान नवीन कामठी पोलीस स्टेशनचे पोलीस पथक गस्तीवर असताना गुप्त माहितीदाराने कन्हान वरून 2 झेनॉन योद्धा पिकअप वाहनांमधून जनावरांची अवैध वाहतूक करीत कामठी कडे जात असल्याची माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारावर नवीन कामठी पोलिस पथकांनी साई मंदिर वडापूर येथे बॅरिकेट्स लावून सदर वाहनाची वाट पाहू लागले परंतु सदर वाहन फार वेगाने येत असल्याची माहिती मिळताच शिताफीने जवळच असलेल्या 10 चाकी ट्रकला आडवे करून वाहतूकीची कोंडी करत अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोन्ही गाड्यांना ताब्यात घेतले दोन्ही वाहनात एकूण 22 गोवंश बैल प्रजातीचे जनावरे निर्दयतेने बांधून कत्तली करता नेत असल्याचे आढळले पोलिसांनी झेनॉन योद्धा M H 40 B G 3261 किंमत 5 लाख व M H 40 Y1138 किंमत 5 लाख रुपये तसेच 22 गोवंश जनावरे प्रत्येक किंमत 15 हजार रुपये एकूण 3 लाख 30 हजार असा एकूण 13 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज जप्त करून आरोपी वाहन चालक अब्दुल रहीम वर्ल्द अब्दुल सुभान वय 27 रा मच्छी पूल मागे शास्त्री चौक कामठी व वसीम खान वर्ल्द शमीन खान वय 30 मोटर स्टँड पेट्रोल पंप जवळ कामठी यांना दोघांना ताब्यात घेतले सदर आरोपी विरोधात अपराध क्रमांक 35/20 कलम 5 (अ)5 (ब) 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 (2015) प्रमाणे सुधारित ,11+1)(घ )( ड) भारतीय प्राण्यांना निर्दयतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 गुन्ह्याची नोंद केली गेल्या 15 दिवसात नवीन कामठी पोलिस स्टेशन पोलिस पथकांनी एकूण 50 गोवंश जनावरांना जीवनदान दिले सदर कार्यवाही सहाय्यक पोलीस उपायुक्त नीलोत्पल परिमंडळ 5 यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय मेडे सपोनि सुरेश कन्नाके पो ह पप्पू यादव मंगेश लांजेवार राजेंद्र टाकळीकर मंगेश यादव सुधीर कनोजिया उपेन्द्र यादव आदींनी पार पाडली
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535