22एप्रील रोजी काटोल तालुक्यातील 82ग्रा प च्या सरपंचपदासह महिलासाठी आरक्षण सोडत तहसीलदार राजू रणवीर यांची माहिती
Summary
काटोल/कोंढाळी वर्ष 2025ते2030 या पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी सरपंचाचे आरक्षण निश्चित करुन देण्यासाठी. राखीव पदामधून ग्रापं निहाय सरपंच व सरपंचांपदामधून महिलांसाठी राखीव ठेवण्याच्या कार्यवाहीसाठी काटोल तालुका स्तरावर 22एप्रील रोजी आरक्षण सोडत काढण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोडती दरम्यान जनप्रतिनिधी […]
काटोल/कोंढाळी
वर्ष 2025ते2030 या पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी सरपंचाचे आरक्षण निश्चित करुन देण्यासाठी. राखीव पदामधून ग्रापं निहाय सरपंच व सरपंचांपदामधून महिलांसाठी राखीव ठेवण्याच्या कार्यवाहीसाठी काटोल तालुका स्तरावर 22एप्रील रोजी आरक्षण सोडत काढण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोडती दरम्यान जनप्रतिनिधी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन काटोल चे तहसीलदार राजू रणवीर यांनी केले आहे.
ग्रामपंचायतीतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण, प्रवर्गाकरिता ग्रामपंचायत निहाय सरपंच आरक्षण व निश्चित केलेल्या सरपंचांमधून महिलांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती. ग्राम पंचायतवाईज नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसह) राखुन ठेवण्याची कार्यवाही करण्यासाठी 22एप्रील रोजी काटोल तालुका मुख्यालयी प्रशासकिय इमारत तळ मजला येथे तहसिलदार यांचे अध्यक्षतेखाली आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती काटोल तहसीलदार कार्यालया मार्फत कळविण्यात आले आहे.

