21 दिवसापासून सुरू असलेल्या आमरण उपोषण तसेच बेमुदत काम बंद आंदोलन
Summary
सदानंद देवगडे (पत्रकार ): अदानी पावर प्लांट, तिरोडा येथील कंत्राटी कामगारांच्या 20 मागण्याला घेऊन माननीय भाई चैनदासजी भालाधरे साहेब, केंद्रीय अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदुर सेना संलग्न न्यू ट्रेड युनियन इनिशिएटिव्ह ,शाखा -तिरोडा यांच्या प्रमुख नेतृत्वात 21 दिवसापासून सुरू […]

सदानंद देवगडे (पत्रकार ): अदानी पावर प्लांट, तिरोडा येथील कंत्राटी कामगारांच्या 20 मागण्याला घेऊन माननीय भाई चैनदासजी भालाधरे साहेब, केंद्रीय अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदुर सेना संलग्न न्यू ट्रेड युनियन इनिशिएटिव्ह ,शाखा -तिरोडा यांच्या प्रमुख नेतृत्वात 21 दिवसापासून सुरू असलेल्या आमरण उपोषण तसेच बेमुदत काम बंद आंदोलन आज दिनांक 09/04/ 2025 ला संपुष्टात आले असून कामगारांच्या मागण्या अदानी व्यवस्थापनाकडून मान्य करण्यात आल्यामुळे संघटनेस ऐतिहासिक यश प्राप्त झालेले आहे. या यशामध्ये साखळी तसेच आमरण उपोषण कर्ते, बेमुदत काम बंद आंदोलन निष्ठेने उपस्थित असलेले 4000 🙏 कंत्राटी कामगार, तिरोडा शाखेचे शाखाध्यक्ष भाई राजू बावनकर जी, शाखा सचिव भाई सत्यानंद शेंडे प्रसिद्धी प्रमुख भाई तसेच कोषाध्यक्ष महेंद्र हिंगे, कार्याध्यक्ष भाई विवेक नागदेवे तसेच सर्व कामगार बंधू -भगिनींचे मौलाचे योगदान आहे. ज्यामुळे आज हा विजय मिळालेला आहे. कामगारांमध्ये हर्ष उल्हासाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. कामगारांच्या एकजुटीमुळे व महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना संघटनेच्या खंबीर नेतृत्वामुळे आज 20 मागण्यामधून 18 मागण्या अदानी व्यवस्थापन कार्यालयामध्ये बैठक घेऊन , उपस्थितिती मध्ये कंपनीचे HR आणि मुख्य पदाधिकारी यांच्या दालनात मागण्या मान्य झाल्या असून 4000 कामगाराला न्याय मिळाला व पुढेही कामगारांना न्याय मिळत राहील अशी ग्वाही संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष भाई चैनदासजी भालधरे यांनी विजय सभेमध्ये कामगारांना दिली. चंद्रपूरचे केंद्रीय प्रभारी भाई सुभाष सिंग बावरे, जिल्हा अध्यक्ष भाई सदानंद पी देवगडे,, जिल्हा सचिव भाई डोमेश्वर धपाडे, शाखा अध्यक्ष भाई विवेकानंद मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष भाई दीपक बेलगे, शाखा सचिव भाई सचिन वटे, शाखा सहसचिव भाई सुरज शेंडे, जिल्हा संघटक भाई दिवाकरजी डबले तसेच चंद्रपूरचे सर्व कार्यकर्त्या टीम तर्फे केंद्रीय अध्यक्ष, भाई चैनदासजी भालाधरे साहेब तसेच तिरोडा शाखेच्या सर्व कार्यकर्त्यांचे तसेच साखळी व आमरण उपोषण करते व आंदोलनामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व कामगार बंधू-भगिनींन चे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदूर सेनेचा विजय असो 💐💐💐✊✊✊👍👍👍💥💥