15 ऑगेस्ट स्वातंत्र्य दिनाचे निमित्ताने चंद्रपूर महा औ. वि. केंद्र ऊर्जानगर येथे बहुजन पॉवर कर्मचारी संघटना, युवा सोशल फाउंडेशन, बहुजन युवा कृती समिती व सामाजिक संस्कृतीक मंच ऊर्जा नगर यांचे वतीने
15 ऑगेस्ट स्वातंत्र्य दिनाचे निमित्ताने चंद्रपूर महा औ. वि. केंद्र ऊर्जानगर येथे बहुजन पॉवर कर्मचारी संघटना, युवा सोशल फाउंडेशन, बहुजन युवा कृती समिती व सामाजिक संस्कृतीक मंच ऊर्जा नगर यांचे वतीने ” रक्तदान ” शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी उपमुख्य अभियंता प्रफुल्ल खुटेमाटे साहेब, मुख्य महा व्यवस्थापक बाहुबली डोदल साहेब, वरिष्ठ व्यवस्थापक(सुरक्षा )शिलरत्न गोंगळे साहेब , उदघाटक कल्याण अधिकारी दिलीप वंजारी साहेब,ऊर्जा नगर सरपंच श्रीमती मंजुषा येरगुडे,पॉवर चे महिला प्रतिनिधी नूरबानो पठाण, बहुजन पॉवर चे केंद्रीय कार्याध्यक्ष राजकुमार गिमेकर, सरचिटणीस ऍड. राजन शिंदे, संघटक श्रीकांत रॉय , केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप मोहोड युवा सोशल फाउंडेशन चे वंश निकोसे, व बहुजन युवा कृती समिती चे अध्यक्ष नयन देशकर, समित आत्राम , चंद्रपूर शासकीय रुग्णालय समन्वयक डॉ. निधी पुनिया मॅडम,श्रीमती.अर्पणा रामटेके मॅडम उपस्तिथ होते. रक्तदात्यांना प्रोसाहीत करणेसाठी उपस्तिथ प्रमुख पाहुण्यांनी मार्गदशन केले तर् मुख्य अभियंता श्री. गिरीश कुमरवार साहेब यांनी कार्यक्रमाला शुभेच्या व्यक्त करत प्रत्येक रक्तदात्याना मार्गदर्शन व रक्तदान करणेकरिता आदेश दिले .तसेच मा.डॉ.भूषण शिंदे साहेब उपमुख्य अभियंता साहेब, शाम राठोड साहेब उपमुख्य अभियंता यांनी शुभेच्छा दिल्या व कार्यक्रम ला उपस्थित वरिष्ठ अधिकारी,अभियंता ,साहेब यांनी रक्त दात्याना प्रशती पत्र, जूस, फळे देऊन त्यांचे प्रति सामाजिक ऋण व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करणे साठी अतिशय कुशल पद्धतीने ऊर्जानगर शाखा बहुजन पॉवरचे सचिव राजेश आत्राम यांनी आपलें पदाधिकारी राजेश पॉल कार्याध्यक्ष, सलीम सय्यद, भीमराव उंदीरवाडे, किशोर हात्ते, छोटू साव, किशोर चुनारकर, सुरेश कुमरे,मंगल गुरनुले.सुखरंजन पेटकर, योगेश किसना साळुके ,अनिल मडावी, प्रकाश घरात, बजरंग पेंदोर महावितरण पदाधिकारी शुभम खोब्रागडे, जीवन आवटे, सचिन पावते, गाडेकर, तसेच कार्यक्रमा करिता आर्थिक मदत करणारे सभासद शुभचिंतक मित्र संघटनाचे पदाधिकारी यांचे समन्वय राखत वरिष्ठ मार्गदर्शक डी. एस. वानखडे, मनोज चतुर,दिलीपजी मोहोड व सर्व टीम यांचे विशेष परिश्रमातुन ३९ रक्त पिशवी चे संकलन करण्यात आले. सर्व पदाधिकारी, रक्त दाते, स्वयंसेवक, आर्थिक, व वस्तू रूपात मदत करणाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
आपले विनीत
राजेश पाल राजेश आत्राम
कार्याध्यक्ष सचिव
पदाधिकारी सभासद
शाखा चंद्रपूर महा.औ वि. केंद्र ऊर्जानगर, चंद्रपूर..