नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

14 फेब्रूवारीला आज कोंढाळी येथे अॅग्रीस्टॅक योजनेच्या शिबिरा चे आयोजन‌ शेतकऱ्यांना मिळणार युनिक फर्मस् आडी ला.भु. विद्यालयात शिबीराचे आयोजन

Summary

कोंढाळी- ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेद्वारे गाव नोंदणी अभियान सुरु, 14फेब्रूवारी रोजी सकाळी 10-00वाजता पासून लाखोटीया भुतडा हायस्कूल येथे कोंढाळी राजस्व मंडळ तसेच मासोद राजस्व मंडळाचे शेतकर्यां साठी अॅग्रीस्टॅक योजनेच्या शिबिरा चे आयोजन‌ करण्याची माहीत काटोल तहसील चे ‌तहसीलदार ‌राजीव रणवीर यांनी दिली […]

कोंढाळी-

‘ॲग्रीस्टॅक’ योजनेद्वारे गाव नोंदणी अभियान सुरु, 14फेब्रूवारी रोजी सकाळी 10-00वाजता पासून लाखोटीया भुतडा हायस्कूल येथे कोंढाळी राजस्व मंडळ तसेच मासोद राजस्व मंडळाचे शेतकर्यां साठी अॅग्रीस्टॅक योजनेच्या शिबिरा चे आयोजन‌ करण्याची माहीत काटोल तहसील चे ‌तहसीलदार ‌राजीव रणवीर यांनी दिली आहे.
*या कॅम्पमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार युनिक फार्मर आयडी, जाणून घ्या सविस्तर माहिती*
*’ॲग्रीस्टॅक’*
अॅग्री स्टेक योजनेद्वारे गाव नोंदणी अभियान सुरु, प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार युनिक फार्मर आयडी, जाणून घ्या सविस्तर माहिती

कोंढाळी/मासोद राजस्व मंडळातील तील प्रत्येक शेतकऱ्याला “ॲग्रीस्टॅक” योजनेद्वारे युनिक फार्मर आयडी दिला जाणार आहे. ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेद्वारे गाव नोंदणी अभियान सुरु, प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार युनिक फार्मर आयडी, बाबतीत मिळालेल्या माहितीनुसार
ॲग्रीस्टॅक योजना देशातील प्रत्येक नागरिकाचा वेगळा आधार आयडी (क्रमांक) आहे… त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याचा एक “युनिक फार्मर आयडी” तयार केलं जाणार आहे.. केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी “ॲग्रीस्टॅक” योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या यूनिक फार्मर आयडी आणि त्यांच्या लँड रेकॉर्डला जोडण्याची ( लिंक करण्याची ) मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.. सध्या त्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू असून लवकरच राज्यात गाव पातळीवर विशेष कॅम्प आयोजित करून एक कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे युनिक फार्मर आयडी तयार केले जाणार आहे..
विशेष बाब म्हणजे भविष्यात शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ याच “युनिक फार्मर आयडी” च्या माध्यमातून मिळणार आहे.. तसेच जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी ही भविष्यात हे युनिक फार्मर आयडी आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने शेतकऱ्यांनी युनिक फार्मर आयडी तयार करून घेणे महत्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या “ॲग्रीस्टॅक” योजने संदर्भात काटोल चे उपविभागीय अधिकारी पियूष चिवंडे तहसीलदार राजीव रणवीर यांनी माहिती दिली आहे.
कोंढाळी व मासोद राजस्व मंडळातील सर्व शेतकऱ्यांनी या शिबिराचा चां लाभ घ्यावा असे आवाहन कोंढाळी नायब तहसिलदार संजय भुजाड, राजस्व मंडळ अधिकारी सुरज साददकर मासोद राजस्व मंडळा अधिकारी कुणाल पिंजदुरकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *