कांद्री ला गळफास लावुन युवकाची आत्महत्या
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत जय दुर्गा नगर कांद्री येथील राहुल गुप्ता या २२ वर्षीय युवकाने गळफास लावुन आत्महत्या केल्याने फिर्यादी यांच्यी तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास करित आहे .
प्राप्त माहिती नुसार शनिवार (दि.१२) जुन २०२१ ला सायंकाळी ५:३० ते १०:०० वाजता च्या सुमारास मृतक राहुल राजबली गुप्ता वय २२ वर्ष रा. जय दुर्गा नगर वार्ड क्रमांक ४ कांद्री (कन्हान) या युवकाने गळ पास लावुन आत्महत्या केली. आत्महत्याचे कारण अजुन ही कळु शकले नसुन कन्हान पोलीसांनी फिर्या दी राजबली मोतीलाल गुप्ता मृतकांचे वडील यांच्या तक्रारी वरून रविवार (दि.१३) जुन २०२१ ला १:३८ वाजता मर्ग दाखल करण्यात आला. सदर प्रकरणाचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात पोशि राहुल रंगारी करित आहे.