⬛⬛शाळेला ठोकले टाळे ⬛⬛
Summary
निळजे गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका सौ.संगीता बाजीराव ठुबे यांच्या बदलीसाठी निळजे ग्रामस्थानी , शाळेतील मुख्याध्यापिका व शिक्षकांनी अनेक वेळा तक्रारी अर्ज करून आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाही पंचायत समिती कल्याण व जिल्हा परिषद ठाणे येथील शिक्षण अधिकऱ्यानी केलेली नाही त्यामुळे […]

निळजे गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका सौ.संगीता बाजीराव ठुबे यांच्या बदलीसाठी निळजे ग्रामस्थानी , शाळेतील मुख्याध्यापिका व शिक्षकांनी अनेक वेळा तक्रारी अर्ज करून आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाही पंचायत समिती कल्याण व जिल्हा परिषद ठाणे येथील शिक्षण अधिकऱ्यानी केलेली नाही त्यामुळे संतप्त ग्रामस्थानी जिल्हा परिषद शाळेला टाळे टोकण्यात आले आहे . जो पर्यंत शाळेतील शिक्षिका सौ संगीत बाजीराव ठुबे मैडम यांची बदली होत नाही तोपर्यंत शाळेचा टाळा खोलण्यात येणार नाही.
सदर प्रसंगी निळजे गावातीला 100 ते 150 ग्रामस्थ जमा झाले होते त्याप्रसंगी तातडीने ग्रामस्थांची बाजू ऐकण्यासाठी कल्याण पंचायत समितीचे उपसभापती श्री किरणजी ठोबरे साहेब व गटशिक्षणाधिकारी सुनीता मैडम केंद्र प्रमुख श्री वेखंडे सर यांनी शाळेला भेट दिली व एका आठवड्यात सदर शिक्षिकेची बदली करण्याचे आश्वासन दिले आहे.