▪ मनरेगाची अपूर्ण असलेली कामे 30 आगस्टपर्यंत पूर्ण करा ▪ ▪ जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांचे निर्देश▪
▪ मनरेगाची अपूर्ण
असलेली कामे
30 आगस्टपर्यंत पूर्ण
करा ▪
▪ जिल्हाधिकारी प्रेरणा
देशभ्रतार यांचे निर्देश▪
० पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क ०
** कोविड एकोणीस च्या संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा परिस्थितीत लोकांच्या रोजगारावर परिणाम होणार नाही व कोणतेही काम थांबू नये , तसेच गर्दी न होऊ देता कामे करण्याची काळजी घेऊन मनरेगाची अपूर्ण असलेली कामे 30 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी. अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आज मनरेगाच्या कामाचा आढावा बैठकीत संबंधित यंत्रणांना केल्यात .आज जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2016 – 17 पासून च्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सचिन ओंम्बासे रोहयो उपजिल्हाधिकारी नितीन पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव वर्धा ,पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहाणे, कार्यकारी अभियंता पडघन, निम्न वर्धा प्रकल्प विभाग, वनविभाग , सामाजिक वनीकरण विभाग ,आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
रोहयोच्या कामावर पाच टक्के दिव्यांग व्यक्तीचे नियुक्तीला प्राधान्य द्यावे. यासाठी प्रत्येक कामावर किमान एखादी व्यक्तीची नियुक्ती करावी . 2021- 22 साठी प्रस्तावित करण्यात आलेले विविध कामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियमानुसार कामे करावी. अशी सूचना यावेळी श्रीमती देशभ्रतार यांनी केल्या. सेवाग्राम येथील अण्णा तलावाच्या सभोवताल असलेल्या झुडपी जंगलात रोहयो योजने अंतर्गत वृक्षलागवड करण्यात त्यांनी सांगितले. त्याचबरोबर वर्धा पाटबंधारे विभागाने सुद्धा रोहयो मधून फळबाग लागवडीची कामे प्रस्तावित करावी अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
सन 2021- 22 साठी जलसंधारण व मृदसंधारण जलव्यवस्थापन , सूक्ष्म व लघु सिंचन कालव्याची कामे व बांधकाम संबंधित कामासाठी यामध्ये नाला सरळीकरण ,बंधारा, माती नाला बांध, स्टॉम डॅम, डॅम समपातळी बांध, वनराई बंधारे ,कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधारे ,दगडी बांध कालवा दुरुस्तीची कामे, गाळ काढणे , तलाव नुतनीकरण, खोलीकरण असलेल्या विहिरी व गुरांचा गोठा , शेळी गोठा व कुक्कुटपालन आदी 3280 कामे प्रस्तावित करण्यात आली आहे .
० पोलीस योद्धा वृत्तसेवा ०
० महेश देवशोध ( राठोड ) ०
० वर्धा , जिल्हा प्रतिनिधी ०
० 73 78 70 34 72 ०