ॲड.डाॅ.सत्यपाल कातकर यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आंबेडकर) चे उमेदवार म्हणून बल्लारपूर विधानसभामध्ये उमेदवारी अर्ज दाखल
राजकुमार खोब्रागडे
प्रसिद्ध मनोवैज्ञानिक,शिष्यवृत्ती आंदोलन प्रणेते,बहुजनाच्या मौलिक समस्या सोडविण्यासाठी सतत संघर्ष करणारे, लेखक, सर्वोच्च विद्याविभुशीत ॲड.डाॅ. सत्यपाल कातकर ह्यांनी श्रीमती प्रियाताई खाडे, जिल्हा अध्यक्ष व विदर्भ महिला आघाडी अध्यक्ष, RPI(A) यांच्या नेतृत्वात व ऋषिजी वाघमारे, अध्यक्ष, समाज क्रांती आघाडी व संतोष गोंगले यांचेसह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थित रॅली सह बँड वाद्याच्या व महापुरुषांच्या जयघोशात दि.२९/१०/ २०२४ ‘मुल’ येथे RPI(A) चे अधिकृत उमेदवार म्हणून बल्लारपूर मतदार संघातून आमदारकीसाठी अर्ज दाखल केला.त्यांच्या पुढील वाटचालीस ओबीसी राजकीय आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विनोद राऊत तसेच ॲड.विजय पुणेकर, ॲड.अमित जयपूरकर, रामकृष्ण पिपरे ह्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.