भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

६ डिसेंबर २३रोजी जिल्हा परिषद कार्यालय भंडारा समोर आत्मदहन करणार राजन वासनिक यांचा निवेदनातुन इशारा ग्रामपंचायत पंचकमेटिसह सचिवावर कार्यवाही करा लाखांदूर तालुक्यातील चिचाळ /को. ग्रामपंचायत अतिक्रमणाचे

Summary

प्रतिनिधी लाखांदूर          लाखांदूर तालुक्यातील ग्रामपंचायत चिचाळ येथील शासकीय जागेवर अतिक्रमण करून तेच भूखंड बाहेर गावातील लोकांना लाखो रुपये किमतीला विकण्याचा गोरख धंदा सुरू आहे. मात्र तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासन कोणतीही कार्यवाही न करता उलट त्यांना पाठबळ […]

प्रतिनिधी लाखांदूर
         लाखांदूर तालुक्यातील ग्रामपंचायत चिचाळ येथील शासकीय जागेवर अतिक्रमण करून तेच भूखंड बाहेर गावातील लोकांना लाखो रुपये किमतीला विकण्याचा गोरख धंदा सुरू आहे. मात्र तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासन कोणतीही कार्यवाही न करता उलट त्यांना पाठबळ देत असल्याचे तक्रार करते नामे, राजन वासनिक सह अन्य दोन व्यक्तीने भंडारा येथील जिल्हा कार्यालया समोर दि. ८ मे २०२३ रोजी उपोषणाला बसले होते. त्यावेळी चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले चौकशी झाली त्यात ग्रामपंचायत पंच कमिटी व ग्रामसेवक दोषी आढळून आले मात्र ४ महिने होऊनही कार्यवाही झाली नाही. त्यांच्यावर आठ दिवसात कार्यवाही करण्यात यावी. ६ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद कार्यालय भंडारा समोर आयपी आत्मदहन करण्याचा इशारा राजन वासनिक यांनी दिला असून तसे निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक भंडारा यांना दिले आहेत .

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये गोरगरीब जनतेवर अन्याय होणार नाही व त्यांना समता बंधुत्व न्याय व स्वातंत्र्य मिळेल यासाठी कायदे भारतीय संविधान घटनेत नमूद केले आहेत परंतु एक वर्षापासून न्यायाची भीक मागत असताना न्याय न मिळाल्यामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी आत्मदहन करणार आहे असे निवेदनात म्हटले आहे.

प्रकरण असे की मौजा चिचाळ येथील भूमापन क्रमांक २४,२५,२६,३९४,३९५,३८५,३८४,३९३, या गटातिल शासकिय जागेवर अतिक्रमण करण्यात आले. व हि जागा
बाहेर गावातील काही लोकांना लाखो रुपये किमतीत विकत आहेत. या विक्रीच्या गोरख धंद्याला सरपंच सचिव व सदस्य यांचे पाठबळ आहे यावर कार्यवाही करण्यात यावी म्हणून एकदा वरिष्ठांना तक्रारी करण्यात आल्या मात्र कोणीही दखल घेतली नाही त्यामुळे दि. ८मे२३रोजी जिल्हा कार्यालय भंडारा समोर उपोषण करण्यात आले यादरम्यान चौकशी करू नये कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले त्यानुसार दि. १२ जुन २३ रोजी तिन सदस्य चौकशी समिती ग्रामपंचायत चिचाळ येथे येऊन मौका चौकशी केली व त्यांनी आपला अहवाल दि. १४ जुलै २३ रोजी आपल्या कार्यालयाला सादर केला.
त्यात सरपंच व सभेला उपस्थित सदस्य व ग्रामसेवक जबाबदार असून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८चे कलम ३९(१) अन्वये कार्यवाहिस पात्र आहेत. तसेच जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम १९६४ चे नियम ३ किंवा ४ नुसार कार्यवाहीस पात्र आहेत. असे स्पष्ट नमूद केले आहे चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होऊन चार महिने झाले मात्र दोषीवर कारवाई करण्यात आली नाही.जर दोषी आढळून कारवाई होत नसेल व आम्हाला न्याय मिळत नसेल तर भारतीय घटनेचा व त्यानुसार प्राप्त अधिकाऱ्याचा काय उपयोग म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आत्मदहन करणार असून यात संबंधित विभागाचे अधिकारी जबाबदार असतील असा सज्जड इशारा राजन वासनिक यांनी निवेदनातून दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *