२ हजार विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा व जागृती उद्बोधन विद्यार्थ्यांनी जिंकली अनेक पारितोषिके
Summary
कोंढाळी : प्रतिनिधी लाखोटिया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात बुधवार 18 ऑक्टोबरला सायबर सुरक्षा व जागरूकता उद्धबोधन व प्रश्न मंजुषा कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पार पडले. विद्यार्थ्यांनी प्रश्न मंजुषेतून अनेक बक्षिसे जिंकली. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे प्राचार्य सुधीर चं.बुटे यांनी भूषविले. प्रमुख […]

कोंढाळी : प्रतिनिधी
लाखोटिया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात बुधवार 18 ऑक्टोबरला सायबर सुरक्षा व जागरूकता उद्धबोधन व प्रश्न मंजुषा कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पार पडले. विद्यार्थ्यांनी प्रश्न मंजुषेतून अनेक बक्षिसे जिंकली. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे प्राचार्य सुधीर चं.बुटे यांनी भूषविले. प्रमुख उपस्थिती शाळेचे उपमुख्याध्याक कैलास थूल , ज्येष्ठ पर्यवेक्षक मनोज ढाले,पर्यवेक्षक हरिष राठी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सायबर सुरक्षा व जनजागृती करिता वक्ते प्रियदर्शनी कॉलेज नागपूर येथील प्रेरणा पाटील,अपूर्वा लोहकपुरे ,समीक्षक काऊलकर, कृष्णा निखाडे यांनी प्रात्यक्षिके, विविघ फसवेगिरीचे प्रकरणे, सायबर गुन्हे, घडण्याची करणे व सुरक्षितता बाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
————-/——-/—
सायबर फसवणूक टाळण्यास स्ट्रॉंग पासवर्ड असावा – प्राचार्य बुटे
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शोध लागत असतांना त्याचे नुकसानाची फटका समाजाला बसत असतांना जागरूकता व सुरक्षा उत्तम उपाय असून ऑन लाईन व्यवहार, मोबाईल होताळतांना आपला पासवर्ड स्ट्रॉग असावा तो कुणाला माहिती नसावा, इंटरनेट माध्यमातून आपली फसवणूक ,प्रसंगी जीव गमविण्याचे प्रकरणे वाढत आहे. यापासून विद्द्यार्थ्यांनी दूर राहण्याचा सल्ला प्राचार्य सुधीर बुटे यांनी दिला. ओरिसा राज्यात शाळांमधून मोठ्याप्रमाणात जनजागृती होत आहे.ति काळाची गरज झाली आहे. अनेक विद्यार्थी मोबाईलचे आधीन जाऊन तासनतास त्यांना धुंद लागली आहे.यामुळे असेच राहिल्यास भविष्यातील पिढ्या बरबाद होईल का!अशी शक्यता अनेकांचे मार्गदर्शनातून वर्तविली आली.याकरिता सायबर सुरक्षा व जनजागृतीची गरज असल्याचे मार्गदर्शक प्रेरणा पाटील यांनी सांगितले.
————–
विद्यार्थ्यांनी पटकावले पारितोषिके…..
सायबर प्रश्न मंजुषा स्पर्धेत मध्ये यदूनंदन भाकरे,सक्षम ठाकरे,कावेरी मोटघरे,नितीन सरोदे , इशांक धर्मे,वेदांती जूनघरे , खुशबू वाढवे,युवराज चव्हाण आदी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्य बक्षिसे स्वरूपात देण्यात आली.
संचलन ज्युनिअर कॉलेज परीक्षा प्रमुख प्रिया धारपूरे तर आभार पर्यवेक्षक हरिष राठी सर यांनी मानले. आयोजनास शिवाजी जामदार, सुनीता नेहारे,आम्रपाली बागडे, शिल्पा पाटील व संध्या भुते,मोनीष हजारे,पंकज राऊत,उज्वल मोटघरे,बंटी चौक, सविता,टेकाडे, मीनाक्षी बोन्द्रे,
छायाचित्रे .तेजस राठी सर साउंड शुभम राऊत, सुभाष पोहोकार,ओम शर्माजी, हरिभाऊ राऊत,यांचे सहकार्य लाभले.