२७-२८-२९मार्च रोजी तीन दिवसीय जल्लोष बळीराजाचा !!! बळीराजा चा हौसी मैदानी खेळ म्हणजे शंकर पट 15लक्ष ₹ची लयलूट तसेच पाव्हणं जरा जपून लावणी महोत्सवाचे महासंग्राम तीन दिवसीय दिग्रस जलसा

काटोल
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालूक्याचे मौजा दिग्रस (बु)येथील प्रगतिशील शेतकरी स्व.राजेंद्रबाबु उर्फ मदनराव खळतकर तसेच काटोल विधानसभेचे माजी आमदार मुकुंदराव गोविंद राव मानकर यांचे स्मृती प्रित्यर्थ दिग्रस बु येथील ग्रामस्थ मंडळ शंकर पट समिती चे वतीने २७,२८,व२९मार्च पर्यंत तीन दिवसीय *दिग्रस जलसा जल्लोष बळीराजाचा* भव्यतम् शंकरपट विदर्भ केसरी पर्व 02 रे आणि महाराष्ट्रातील ग्रामीण कला संस्कृती ची जतन करनारा *पाव्हणं जरा जपून* या लावणिचा महासंग्राम मुंबई या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्यतम् शंकरपटाचे उद्घाटन नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक अशोकराव खराडे यांचे हस्ते व मनोज (भैय्या) खडतर यांचे मार्गदर्शनाखाली15लाख रूपयांचे बक्षिसांचे तीन दिवसीय भव्यतम् शंकरपटाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
या शंकरपटाचे आयोजन तीन गटात विभागणी करण्यात आली आहे. यात आम जनरल गटा प्रथम बक्षिस 1,11,111₹व आकर्षक ट्राफी सह 91हजार ते 10हजारापर्यंत एकूण 15बक्षिसे व आकर्षक ट्राफी, या गटाची प्रवेश फी 2500₹आहे.
दुसरा गट
दुसर्या गटात काटोल व नरखेड तालुका या गटा करिता51हजार ते तीन हजारांवर एकूण वीस बक्षिसे व आकर्षक ट्राफी ठेवण्यात आली आहेत.या गटाकरीता प्रवेश फी1500₹ ठेवण्यात आली आहे. तर
तीसरा गट हा गाव गट असनार आहे. यात दिग्रस येरला, वंडली,मसली येनवा,पारडसिंगा खानगाव, फेटरी,हरणखुरी व पानवाडी या गावातील शेतकरी व शंकरपटाचे प्रेमींना दहा हजार ते एक हजार रूपये पर्यंत दहा बक्षिसे देण्यात व ट्राफी देण्यात येणार आहे. हा गट २७मार्च ला सोडण्यात येणार आहे. या गटाची एंट्री फी ७००/-ठेवण्यात आली आहे.
पाव्हणं जरा जपून
तीन दिवसीय शंकरपटाचे विशेष आकर्षण म्हणजे पाव्हणं जरा जपून लावणी महोत्सव ची मेजवानी ती 28मार्च ला सायंकाळी 07 वाजता मैफिल रंगणार असल्याचे कार्यक्रमाचे मार्गदर्शक मनोज (भैय्या) खडतकर, यांनी माहिती दिली आहे.