BREAKING NEWS:
ब्लॉग महाराष्ट्र हेडलाइन

२० रुपयात काढा २ लक्षाचा विमा अपघातात उपयोगी – प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

Summary

दैनंदिन धावपळीच्या जीवनात आयुष्य महत्वाचे आहे. अनावधाने अपघात झाल्यास  अशा वेळी पूर्ण कुंटुंबावर त्याचा परिणाम होतो. कुटुंबाची आर्थिक स्थिती खालवली असल्याने अशा वेळी प्रधानमंत्री सुरक्षा योजना अत्यंत लाभदायी ठरणार आहे. या योजनेचा विमा हप्ता केवळ 20 रुपये असून अपघातात पूर्णत: अपंगत्व […]

दैनंदिन धावपळीच्या जीवनात आयुष्य महत्वाचे आहे. अनावधाने अपघात झाल्यास  अशा वेळी पूर्ण कुंटुंबावर त्याचा परिणाम होतो. कुटुंबाची आर्थिक स्थिती खालवली असल्याने अशा वेळी प्रधानमंत्री सुरक्षा योजना अत्यंत लाभदायी ठरणार आहे. या योजनेचा विमा हप्ता केवळ 20 रुपये असून अपघातात पूर्णत: अपंगत्व आल्यास 2 लक्ष रुपये व आंशिक अपगंत्व आल्यास 1 लक्ष रुपये मिळतात. बॅक खातेधारकांनी आपल्या बँकेत साधा अर्ज करावा.  खात्यातून आपोआप ही विम्याची रक्कम वर्ग करण्यात येते. राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी उपक्रमात प्रत्येक बँकेत हा अर्ज भरुन घेण्याची सूचना आहे. जनतेने याचा लाभ घ्यावा.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना केंद्र शासनाची अपघात विमा योजना असून  मे 2015 पासून ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचा विमा हप्ता 13 रुपये होता त्यामध्ये वाढ करुन आता फक्त 20 रुपये करण्यात आला आहे.  भारताच्या फक्त 20 टक्के  लोकांजवळच कोणत्याना कोणत्या प्रकारचा विमा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या योजनेंतर्गत 11 लक्ष लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेची व्याप्ती वाढविण्याकरीता जास्तीत जास्त बँक खातेदारांनी यामध्ये सहभागी व्हावे हा मूळ ध्येय आहे.

विमा कोणास अनुज्ञेय याबाबत थोडक्‌यात माहिती : 18 ते 70 वयोगटातील सर्व व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात, लाभार्थ्याचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे. योजनेसाठी वार्षिक हप्ता 20 रुपये असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँकखात्यातून आपोआप वर्ग होईल, हप्त्यासाठी आर्थिक वर्षे 1 जून ते 31 मे असेल. प्रत्येक बँकेत या संदर्भातील अर्ज आहे. खाते असणाऱ्या प्रत्येकाने हा अर्ज करणे आवश्यक आहे.

वैशिष्ट्ये

लक्ष्यगट – अपघात विमा न नोंदवलेले सर्व नागरिक

वय व पात्रता – 18 ते 70 वयोगटातील सर्व व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात, लाभार्थ्याचे बँकेत खाते असणे जरुरीचे आहे.

हप्ता- योजनेसाठी वार्षिक हप्ता 20 रुपये असून तो दरवर्षी लाभार्थ्याच्या बँकखात्यातून आपोआप वर्ग होईल, हप्त्यासाठी आर्थिक वर्षे  1 जून ते 3 मे असेल.

विमा लाभ – लाभार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसदाराला 2 लाख रुपये अर्थसाहाय्य मिळेल, लाभार्थ्याला अपघातामुळे पूर्ण अपंगत्व आल्यास 2 लक्ष रुपये व आंशिक अपंगत्व आल्यास 1 लक्ष रुपये अर्थसाहाय्य दिले जाते .

खाते ऑटो व डेबिट करण्याची सुविधा या योजनेमध्ये आहे. योजना न्यू इंडिया एश्योरेंस कंपनीशी संलग्नित आहे.

व्यवस्थापन – योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी एल आय सी किंवा कोणत्याही विमा कंपनीत खाते उघडू शकतो.

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांमध्ये प्रत्येक बँकेने  हा  अर्ज भरुन घ्यावा. केवळ 20 रुपये खात्यातून कपात होणाऱ्या या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, आवाहन असे जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक मोहित गेडाम यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *