१ जून नंतर लॉकडाऊन शिथिल होणार ? राज्यातील कोणकोणते जिल्हे रेडझोनमध्ये ?
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 26 मे. 2021 :-
महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग असलेल्या रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता आहे. राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये असून तिथले निर्बंध सरसकट शिथिल करता येणार नाहीत अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
राज्यातील रेड झोन असलेले जिल्हे :* बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशीम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद
महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे राज्य सरकार रेड झोनमधील जिल्हे वगळता इतर जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याच्या विचारात आहे.