१५ ऑगस्ट २०२१ ला ७५ वा स्वातंत्रदिन कन्हान ला थाटात साजरा
कन्हान : – शहरात विविध शाळा, सामाजिक, राजकि य संस्था व्दारे १५ ऑगस्ट २०२१ ला ७५ वा स्वातंत्र दिन सोहळा थाटात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्य दिवसी शहर विकास मंच द्वारे शहिदांना व महापुरुषांना श्रद्धांजली अर्पण
कन्हान शहर विकास मंच द्वारे ७५ व्या स्वातंत्र्य दिवसा निमित्त तारसा रोड शहिद चौक येथे जेष्ठ नाग रिक भरत सावळे यांच्या हस्ते शहिद स्मारकावर व महापुरुषांना पुष्पहार, माल्यार्पण व पुष्प अर्पित करू न दोन मिनट मौनधारण करून शहिदांना व महापुरुषां ना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
रविवार दिनांक १५ ऑगस्ट २०२१ ला ७५ व्या स्वातंत्र्य दिवसा निमित्त कन्हान शहर विकास मंच द्वारे तारसा रोड शहिद चौक येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नागरिक भरत सावळे यांच्या हस्ते व शहर विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर यांच्या हस्ते शहिद स्मारकावर व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार, माल्यार्पण करित दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. राष्ट्रध्वज तिरंगा झेंडाला सलामी देऊन, राष्ट्रगीत गाऊन शहिद स्मारकावर व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण आणि दोन मिनट मौनधारण करून शहिदांना व महापुरुषांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी कन्हान शहर विका स मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, जेष्ठ नागरिक भरत सावळे, हरीओम प्रकाश नारायण, शाहरुख खान, महेंद्र साबरे, हर्ष पाटील, रविंद्र सांकला , सुषमा मस्के, प्रकाश कुर्वे, विनोद कोहळे सह मंच पदाधिकारी उपस्थित होते.
श्रीमती हिराबाई उच्च प्राथ. शाळा कन्हान
१५ ऑगस्ट २०२१ रविवार ला ७५ व्या स्वातंत्र दिनी श्रीमती हिराबाई उच्च प्राथमिक शाळा व वसती गृह कन्हान येथे स्वातंत्र दिन थाटात साजरा करण्यात आला.
शाळेचे संचालक मा.नरेंद्रजी वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला, याप्रसंगी कु. लिला खुरगे आणि वसतीगृह अधीक्षक गणेश रामापुरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका वंदना रामापूरे हयानी केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चांदेवार सर यांनी तर आभार मोहनकार सर यांनी व्यकत केले.
नगर कांग्रेस कमेटी कन्हान
गांधी चौक कन्हान येथे नगर कॉग्रेस कमेटी व्दारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून कॉग्रेस कमेटी पारशिवनी तालुका अध्यक्ष मा. दयारामजी भोयर यांच्या अध्यक्षेत आणि नगर कॉग्रेस कमेटी कन्हान अध्यक्ष व नगरसेवक राजेश यादव यांच्या हस्ते ध्वजारोहन करून स्वातंत्रदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी लवजी तिवारी, गणेश माहोरे, श्याम पिपलवा, माणिकराव वाघधरे, प्रकाश नाईक, अमोल प्रसाद, आकीब सिद्धीकी, प्रकाश बोंद्रे, प्रमोद बांते, रवि रंग, सिद्धार्थ ढोके सह बहुसंख्य कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.
स्वातंत्र दिन नवोदय जनोत्थान संघटन कन्हान व्दारे वृक्ष वितरण करून थाटात साजरा.
१५ ऑगस्ट २०२१ ला ७५ वा स्वातंत्र दिवस विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, माहात्मा जोतीबा फुले, भारत माता, भगतसिंह, लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला संघटन अध्यक्ष प्रविण गोडे व मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. राष्ट्र ध्वज तिरंगा झेंड्याला मानवंदना सलामी देऊन राष्ट्रीय गीत गायन करण्यात आले. गावातील नागरीकांना तसेच पत्रकारांना वृक्ष वितरण करण्यात आले.
भारत देशाचे स्वातंत्रता सेनानी विर जवानाच्या जिवना वर संघटन सचिव प्रदीप बावने व सहसचिव अभिजित चांदुरकर, कोषाध्यक्ष सतीश उके हयानी प्रकाश टाक ला. यावेळी नविन सभासद म्हणुन दिनेश नारनवरे, चंद्रशेखर वंजारी, चंदु पानतावने, दिपनकर गजभिये, विक्रांत माहोरकर आदीने संघटनेत प्रवेश घेतला. या प्रसंगी ज्ञानेश्वर दारोडे, सोनु मसराम, महेश शेंन्डे, आनंद भाऊ बेलसरे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्य क्रमाचे सुत्रसंचालन अखिलेश मेश्राम यांनी तर आभार संघटन उपाध्यक्ष संजय रंगारी यांनी व्यकत केले. कार्य क्रमाच्या यशस्विते करिता मनिष शंभरकर, प्रकाश कुर्वे, सोनु खोब्रागडे, प्रविण माने, अरूण थापा, पंकज रामटेके, आकाश पंडीतकर, मुकेश गंगराज, योगेश मोहोड, शरद यादव आदीने सहकार्य केले.
कन्हान शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे रा.काॅं.पा कन्हान शहर अध्यक्ष अभिषेक किशोर बेलसरेे व श्यामबाबु पिपलवा यांच्या हस्ते ध्वजारोहन करून देशाचे राष्ट्रभक्त, महापुरुष, प्राणाचे बलिदान देणारे क्रांतीकारी हयाना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी रामटेक विधानसभा अध्यक्ष किशोर बेलसरे, लवजी तिवारी, मोहम्मद शफीक शेख, मीडिया सेल जिला महासचिव रोहित मानवटकर, रामटेक विधानस भा सचिव भारती, युवक राष्ट्रवादी काँग्रेस रामटेक विधानसभा अध्यक्ष देेेविदास तडस, गणेश पानतावणेे, विनायक वाघधरे, पुरुषोत्तम कुंभलकर, मधुकर नाग पुरे, पत्रकार रवींद्र दुपारे, लड्डू सराफ, मोरेश्वर सायरे, डॉ. प्रदीप राणेेे, विश्वास सरोदेे, रमेश खंडेलवाल, दिवा ळु मेश्राम, अरुण आरभी, जनार्दन बागळे, मुरीलाल सोनी, प्रमिला मते, मायाताई भोयर, योगिता भलावी, प्रितीताई, सुनिता मानकर, कमलेश शर्मा, अनिल भालेकर, रवी महल्ले, बैजु ठेकेदार, मधुकर धोपाडेे, गणेश भालेकर, किशोर शेंडे, रॉबिन निकोसे, आनंद बेलसरे, अमित बेलसरे, अश्विन सायरे, दिवाकर इंगोले, राजु इंगोले, प्रमोद दमाहे, गौरव कुंभलकर, सागर मानवटकर, आदित्य जैन, सुमित खंडेलवाल, राजकुमार तिवारी, गणेश गणोरकर सह कार्यकर्ता व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मो. रफीक शेेख व आभार पुरुषोत्तम कुंभलकर यानी व्यकत केले.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535