होळी, धुलिवंदनानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. १३ : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी होळी तसेच धुलिवंदनानिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
होलिकापूजन तसेच प्रेम, स्नेह व बंधुभावाचे प्रतिक असलेला रंगोत्सव सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो व परस्परांमधील द्वेष भावना नष्ट करो, या शुभकामनेसह सर्वांना होळी व धूलिवंदनानिमित्त हार्दिक शुभेच्छा राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी दिल्या. तसेच होळी व रंगोत्सव साजरा करताना पर्यावरण रक्षणाबद्दल जागरुक राहण्याचे आवाहनही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशाद्वारे केले आहे.
00000