नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

होमगार्ड मतदानापासून वंचित!

Summary

कोंढाळी/काटोल-वार्ताहर एकीकडे प्रशासन मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करीत असताना, निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात गृहरक्षक दलाचे शेकडो जवान (होमगार्ड) मतदानापासून वंचित राहतअसल्याचे समोर आले आहे. नियमाप्रमाणे आपल्या संबंधित मतदान केंद्रापासून दूर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या होमगार्डची मतदानासाठी कोणतीही सोय करण्यात आलेली नसल्याने त्यांना […]

कोंढाळी/काटोल-वार्ताहर
एकीकडे प्रशासन मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करीत असताना, निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात गृहरक्षक दलाचे शेकडो जवान (होमगार्ड) मतदानापासून वंचित राहतअसल्याचे समोर आले आहे. नियमाप्रमाणे आपल्या संबंधित मतदान केंद्रापासून दूर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या होमगार्डची मतदानासाठी कोणतीही सोय करण्यात आलेली नसल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.

निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी हजारो पोलिस कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ‘महाराष्ट्र होमगार्ड’चे शेकडो कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असतात. निवडणुकीसाठी तैनात बहुतांश होमगार्ड महाराष्ट्रातील असल्याने निवडणुकीसाठी त्यांना ड्युटी करूनही मतदान करण्याची कोणतीही सोय करण्यात येत नसल्याचे सांगितले जाते. निवडणुकीसाठी काम करणाऱ्या व्यक्तींसाठी मतदानाची पर्यायी व्यवस्था म्हणून ‘इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट’ (ईडीसी) व ‘पोस्टल बॅलेट’ अशी कोणतीही प्रक्रिया होमगार्डसाठी करण्यात न आल्याने त्यांना मतदान करणे शक्य झाले नाही.

मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांसोबतच होमगार्डची भूमिका महत्वाची ठरते. यासाठी प्रत्येक मतदात केंद्रावर मतदानाच्या एक दिवस आधीपासून हे होमगार्ड ड्युटीसाठी जातात त्यानंतर मतदान प्रक्रिया संपवून मतदान यंत्रे सुरक्षित ठिकाणी पोहोचेपर्यंत या कर्मचाऱ्यांना ड्युटीची जागा सोडता येत नाही. एखाद्या कर्मचाऱ्याचे मतदान केंद्र ड्युटीच्या स्थळापासून जवळपास असले तरी ड्युटी संपेपर्यंत जागा सोडल्यास शिस्तभंगाच्या कारवाईची भीती असते. त्यामुळे राज्यात सर्वत्र मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न होत असताना प्रशासकीय अनास्थेमुळे शेकडो होमगार्ड मतदानापासून वंचित राहतात. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के मतदान होण्यासाठी विशेष मोहीम राबवून टपाली मतदान करून घेण्यात आले. होमगार्ड्सच्या संबंधित विभागाने निवडणूक काळात कामगिरीवर असलेल्या होमगार्ड यांना त्यांच्या कर्तृत्वाचे ठिकाणी मतदान करण्याची सोय करावी अशी मागणी करण्यात आली आहे. ग्राम पंचायत ते लोकसभेच्या निवडणुकीवेळीदेखील असाच प्रकार घडत असते , त्यामुळे या वेळी कर्मचाऱ्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. जवळपास मतदान केंद्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तरी काही वेळ देऊन मतदानासाठी जायला मिळेल अशी अपेक्षा असते. मात्र, मतदानासाठी उत्सुक या कर्मचाऱ्यांचा अखेर हिरमोडच होत असते. एकीकडे प्रशासन शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचाच भाग असलेल्या या कर्मचारांच्या मतदानासाठी उत्सुक या कर्मचाऱ्यांचा अखेर हिरमोड होत असते. एकीकडे प्रशासन शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचाच भाग असलेल्या या कर्मचारांच्या मतदानासाठी काळजी न घेतल्याने होमगार्ड्स कडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
या बाबतीत काटोल तहसील निवडणूक अधिकारी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की या बाबतीत संबंधित विभागाने निवडणूक पुर्वी चे अवधीत निवडून विभागाशी संपर्क केल्यास या बाबद चा मार्ग निघु शकतो.
त्याच प्रमाणे नागपूर जिल्हा होमगार्ड प्रमुख अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ संदिप पखाले यांना विचारले असता त्यांनी सांगितले की या प्रकरणी संबंधित विभागासोबत चर्चा करून मार्ग काढण्याची माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *