हुतात्मा स्मृती दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून अभिवादन
Summary
मुंबई ,दि. २१ : हुतात्मा स्मृती दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे […]
मुंबई ,दि. २१ : हुतात्मा स्मृती दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर,पर्यटन, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर , महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल मुंबई शहर चे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह राजशिष्टाचार विभाग, महापालिका, पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.