*हुंडा साठी पत्नी ची हत्या*
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क सहकारी संपादक राजेश उके द्वारा विशेष रिपोर्ट* -पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील गाव पानोडी येथील ज्योति उर्फ अनिता सोमनाथ दिघे(वय ३३वर्ष)माहेरुन पैसे आणले नाही म्हणून तिच्याच पति ने खुन केला.
सरकार कित्येक हुंडा विरोधी कायदे करते पन कित्येक विवाहित स्त्रियांचे हुड्यापाई बळी पडतात.सरकारने ह्या कायद्याला जास्त प्राधान्य देऊन महिला व बालविकास मंत्रालय माध्यमातून जनजागृती करण्याची गरज आहे,नाहितर हजारो लाखो निरपराध स्त्रीयांचे बळी पडतिल.
सविस्तर वृत्त असे की ज्योति गाव जामगाव तालुका गंगापुर हिचा विवाह सोमनाथ दिघे यांच्यासोबत सोडा वर्षांपूर्वी झाला.तिला दोन मुली व एक मुलगा आहे.
सुरवातीला दोन वर्षं त्यांचा संसार चांगला चालला.
पण काही किरकोळ कारणावरून तो आपल्या पत्नीला शिविगाळ करत होता आणी मारहाण करत होता.
तिन वर्षापुर्वी पती सोमनाथ दिघे ने * गाय*घेण्यासाठी पैशाची मागणी पत्नि ज्योति मार्फत आपल्या सासऱ्याला केली.
ज्योति च्या वडिलांची परिस्थिती गरिबीची असतांना सुध्दा मुलिच्या संसारात कमतरता पडू नये म्हणून घरची कसलेली गाय जावयाच्या घरी पोहोचविली.
मात्र सोमनाथ दिघे(जाव ई)याची अपेक्षा दिवसेंदिवस वाढतच राहिली.
काही कालावधीनंतर सोमनाथ दिघे नी आपल्या पत्नी मार्फत मोटारसायकल घेण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी केली पण सासऱ्याने पन्नास हजार रुपयांची मागणी पूर्ण केली नाही.
दिनांक 27//2//2021दुपारी एक वाजे दरम्यान पति सोमनाथ दिघे याने पत्नी ज्योती दिघे हिच्या लोखंडी वार करुन तिचा खुन केला.व नंतर लोनी दवाखान्यात गेल्यावर तिच्या भावाला फोन आला, भाऊ दवाखान्यात येताचं बहिण मृत्यू मुखी पडलेल्या अवस्थेत होती, त्यावेळी तिच्या डोक्यात मोठि रक्ताने माखलेली जखम दिसत होती, चेहऱ्यावर मारहाण केल्याच्या खुणा दिसत होत्या.
आरोपी सोमनाथ दिघे यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
28//02//2021ला ला ज्योति चा पानोडी गावात अंत्यसंस्कार करण्यात आला त्यावेळी पोलीसांचा फौजफाट्यासह व गावकरी व नातेवाईक होते.
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष संवाददाता
:-9765928259