हिंस्र वन्यप्राण्यांकडून प्राणांतिक हल्ले
Summary
रात्र जागल बंद सांगा साहेब !!शेतकऱ्याने जगायचं तरी कसं? कोंढाळी – बॉक्स👇 {निसर्गाचा लहरीपणा, सरकार योग्य भाव देईना, त्यातही हिंस्र वन्यप्राण्यांकडून शेतकरी व गोपाल गुराख्यांवर प्राणांती हल्ले,वन्य प्राण्यांकडून पिकांची ‘लूट वनविभागाने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात […]
रात्र जागल बंद
सांगा साहेब !!शेतकऱ्याने जगायचं तरी कसं?
कोंढाळी –
बॉक्स👇
{निसर्गाचा लहरीपणा, सरकार योग्य भाव देईना,
त्यातही हिंस्र वन्यप्राण्यांकडून शेतकरी व गोपाल गुराख्यांवर प्राणांती हल्ले,वन्य प्राण्यांकडून पिकांची ‘लूट वनविभागाने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.}
कोंढाळी- वार्ताहर-
नागपूर वर्धा जिल्ह्यातील काटोल तालूक्यातील कोंढाळी /मासोद तसेच वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील धानोली मेट राजस्व मंडळांचा भाग वनपरिक्षेत्र कोंढाळी, कारंजा, बोर बफर कवडस वनपरिक्षेत्रात येतात. बोरं व्याघ्रप्रकल्पातील हिंस्र वन्य प्राणी वाघ 🐯,बीबट, अस्वलांचा बोर अभयारण्य बफरझोन तसेच लागून असलेल्या गावा शिवारात या हिंस्र वन्यप्राण्यांचा मुक्त संचार, व या मुक्त संचारादरम्यान गोपालक गुराखी,व शेतकऱ्यांवरील प्राणांतिक हल्ले .त्याच प्रमाणे
अपेक्षित पाऊस झाला नसल्याने आधीच शेतकरी संकटात असताना, आत त्यांच्यासोमर आणखी एक नवीन संकट उभं राहिले आहे. नागपूर/ वर्धा जिल्ह्यातील सीमेवर असलेल्या बोरं व्याघ्रप्रकल्पातील वन्य जीवांकडून अनेक भागात उगवून आलेले कोवळे पिकं हरण, रोही, उदबिल्ला, रानडुक्कर, नीलगाई, मोर आदी वन्य प्राणी नासधूस करत फस्त करत आहे. संत्रा-मोसंबी 🍊 च्या उभ्या झाडांना मुळापासून उपटून टाकण्यासारखे रानडुक्करांनी हैदोस मांडला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. तर वनविभागाने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. शेतकर्यांचे तक्रारी वरून वन विभागाचे अधिकारी मोका पंचनामा करून जातात, मोबदल्याचे प्रकरण ही बनवतात मात्र मिळणारा मोबदला अत्यंत तुटपुंज्या प्रमाणात मिळतो अशी माहिती मौजा धुरखेडा येथील शेतकरी विठ्ठलराव एके यांनी दिली
. विठ्ठलराव ऊके यांचे प.ह. 67,शेत सर्वे -मधील एकर मधील संत्रा बागातीचे डूकरानी मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. या भागातील शेतकर्यांनी सांगितले की
अपेक्षित पाऊस न झाल्याने कमी-अधिक झालेल्या या पावसाच्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी रबीची पेरणी केली. पिकं उगवली आहे. मात्र, या कोवळ्या अंकुरांवर वन्य प्राणी रात्रीच्या सुमारास हल्ला करत पिकं फस्त करत आहे. त्यामुळे रात्रीतून शेतातील पिके गायब होत असल्याने शेतकरी धास्तावले आहे. तसेच यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभं राहत आहे.
हिंस्र वन्यप्राण्यांचा धाक , रात्र जागल बंद
कोंढाळी/कारंजा (घा)/बोरबफर झोन-कवडस या वनपरिक्षेत्रातील शेतकरी, गोपालक, गुराखी, व सर्व सामान्य नागरिकांनी बोर अभयारण्यातील हिंस्र वन्यप्राण्यांचा मुक्त संचारा मुळे कारंजा/कोंढाळी वनपरिक्षेत्रातील दोन तीन वर्षांत पाच गोपालक व गुराख्यांवरिल प्राणांतिक हल्ल्यात जीव गमावला आहे. 10डिसेंबरला उंबरविहिरी येथील वन कक्ष 41मधे उंबरविहिरी येथील रमेश श्रावण पिंपळे (67)या गुराख्यावर पट्टेदार वाघाने हल्ला केला व आपले भक्ष बनविले यात रमेश पिंपळे चां जीव गेला. वन्य प्राण्यांच्या हैदोसात एका वर्षात एकट्या कोंढाळी वनपरिक्षेत्रातील शेतकरी व गोपालकांच्या ९२ते९५ गोवंश व अन्य जनावरांना आपले भक्ष बनविले आहे. बोर अभयारण्य व्याघ्र प्रकल्पाच्या बफरझोन मधून बिबट, पट्टेदार वाघ,अस्वलं(नर/मादी) यांचा कोढाळी भागातील बफर झोन लगतच्या परिसरात , रामगड, प्रतापगड, हिरजी मेट,धानोली, उंबरविहिरी,तसेच चिंचोली, अहमदनगर पर्यंत चे भागात या हिंस्र वन्यप्राण्यांचा सदैव मुक्त संचार असतो,या
हिंस्र वन्यप्राण्यांचा हैदासामुळे शेतकऱ्यांनी आप आपल्या शेतातील रात्र जागल बंद केली आहे या मुळे शेतकर्यांचे उभे पीकाची नासाडी होत आहे अशी माहिती धोतीवाडा -खापा येथील सरपंच निलीमा चंद्रशेखर ढोरे तसेच मासोद येथील सरपंच रंजू प्रकाश बारंगे यांनी दिली आहे.
आधीच अपेक्षित पाऊस नाही त्यातही आता वन्यप्राणी यांच्या धुडगूसमुळे बळीराजा हतबल झाला आहे.
*काटोल तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान…*
वन्य प्राण्यांच्या हैदोसात
काटोल तालुक्यातील कोंढाळी , बोरगाव, धुरखेडा, चिखली,खापा धोतीवाडा, कामठी, मासोद, जाटलापुर, पुसागोंदी, घुबडी ,खैरी, मिनीवाडा ,मसाळा, बिहालगोंदी,कुंडी, माहोरखोरा, शेकापूर, जामगढ, खापरी, अहमदनगर,चिंचोली, जाटलापुर, मेंढेपढार,दोडकी, इत्यादी गावात आणि परिसरात नुकत्याच उगवून आलेल्या पिकांच्या कोवळ्या अंकुरांवर हरण, रोही, माकड, उदबिल्ला, रानडुक्कर, नीलगाई, माकड, मोर आदी वन्य प्राणी डल्ला मारताना पाहायला मिळत आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी धास्तावले असून, या वनविभागाने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. कोंढाळी वनपरिक्षेत्राच्या व बोर अभयारण्य व्याघ्रप्रकल्पाच्या बफर परिसरातील डोंगर आदी परिसरांतील शेतातील पिकांमध्ये वन्यप्राणी असाच धुडगूस घालतांना दिसत आहे.
शेतकरी संकटात…
अपेक्षित पाऊस न झाल्याने रबीची पिकं धोक्यात येऊ शकतात. दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या हैदोस , *सांगा! शेतकऱ्यांनी कसं जगावं?* असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वन विभागाने अशा वन्यप्राणी यांचा बंदोबस्त करण्याची मागणी या भागातील शेतकरी वीरेंद्र सिंह व्यास, महेंद्र ठवळे,पदम डेहणकर, सतीश पाटील चव्हाण,राष्ट्रपाल पाटील, रामदास मरकाम,नरेश नागपूरे, शामराव तायवाडे, गजेंद्र राऊत, शेषराव कुथे,चंद्रशेखर ढोरे, रमेश चव्हाण, संजय राऊत, राजकुमार चोपडे, थामस निंभोरकर,प्रकाश बारंगे, रवी जयस्वाल,बंडू राठोड,सतीश पुंजे,रामचंद्र चव्हाण, गणेश वानखेडे, नरेश आगरकर,रहूल डोंगरे, नरेश नारनवरे,राजू किनेकर,किस्मत चौहान, उत्तम काळे, गुणवंत जिचकार, बाबाराव, कुणाल भांगे, प्रमोद आष्टणकर, शाहिद शेख,
विठ्ठलराव ऊके,पवन पेंदाम,याकूब पठाण,निखील जयस्वाल,प्रेमराज मानमोडे, प्रविण गांधी,अंकित चव्हाण, प्रज्वल धोटे,यांनी केले आहे.