हिंदुस्तान स्काऊट अँड गाईड नागपुर जिल्हा चेअरमेन दीपचंद शेंडे ची नियुक्ती
हिंदुस्तान स्काऊट अँड गाईड नागपुर जिल्हा चेअरमेन दीपचंद शेंडे ची नियुक्ती
कन्हान : – हिंदुस्तान स्काऊट अँड गाईड्स असोसिए शन महाराष्ट्र व्दारे कन्हान रहिवासी दिपचंद शेंडे याना नागपुर जिल्हा चेअरमन पद्दी नियुक्ती श्री प्रशांत कळंबे द्वारे नियुक्ती पत्र देऊन करून त्यांच्या चंमु ची जिल्हास्तरावर नियुक्ती करण्यात आल्याने परिसरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भारत सरकार तथा महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे एनसीसी प्रमाणे हिंदुस्तान स्काऊट अँड गाईडचे शाळा व महाविद्यालयात प्रशिक्षण देणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्काऊट अँड गाईड चे कॅम्प प्रशिक्षण प्रमा णपत्र राज्य पोलीस, राज्य राखीव पोलीस, बीएसएफ, केंद्रीय राखीव पोलीस बल, पॅरामिलिटरी फोर्सेस च्या नोकरी मध्ये पाच टक्के आरक्षण कोटा देण्यात आला आहे. स्काऊट अँड गाईड व्दारे राष्ट्रपती पुरस्कार तसे च राज्य गव्हर्नर पुरस्काराची निवड करण्यात येते. ती राष्ट्रपती आणि गव्हर्नर द्वारे प्रदान करण्यात येते. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसा करिता आणि गणराज्य दिवस २६ जानेवारी ला दिल्ली परेड करिता विद्यार्थी व प्रशिक्षणार्थ्याची निवड करून त्याना राष्ट्रीय स्तराचे प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येतो. दीपचंद शेंडे सह जिल्हास्तरावर विश्वजीत गायकवाड, प्रविण सोनेकर, अभिजीत चांदुरकर, दिपाली व्यवहारे, भारती कनोजे, कल्याणी भगत, रितिक उके, राजेश्री खांदारे, विजय गुप्ता, विजय चौधरी, अमन रहिले आदी सर्वा ची विविध पद्दी नियुक्ती करण्यात आली आहे.
दीपचन्द शेंडे सह त्यांच्या चंमु च्या नियुक्ती बद्दल त्यांचे परिसरात जागो जागी स्वागत, सत्कार करण्यात येत असुन राजु हिंदुस्तानी, चंद्रशेखर अरगुलेवार, पंकज मिश्रा, संदेश सिंगलकर, राजेंद्र खंडाईत, विजय पारधी, देवेंद्रसिंग सेंगर, अमित शेंडे, रविकांत मेश्राम, जगदीश पाटील, अमित मुदगल आदीने अभिनंदना चा वर्षाव केला आहे.
संजय निंबाळकर