पर्यावरण महाराष्ट्र मुंबई राजकीय हेडलाइन

हिंदमाता परिसरात रस्त्याची उंची वाढवल्याने वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

Summary

मुंबई, दि. 25 : शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोडवर हिंदमाता उड्डाणपूल आणि परळ टीटी उड्डाणपूल यामधील रस्त्याची उंची वाढवून केलेल्या कामाचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. या ठिकाणी रस्त्याची उंची वाढल्याने सखल भागात पाणी साचून होणारी […]

मुंबई, दि. 25 : शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोडवर हिंदमाता उड्डाणपूल आणि परळ टीटी उड्डाणपूल यामधील रस्त्याची उंची वाढवून केलेल्या कामाचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. या ठिकाणी रस्त्याची उंची वाढल्याने सखल भागात पाणी साचून होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यास मदत होईल, असे प्रतिपादन श्री. ठाकरे यांनी केले.

यावेळी मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू, उपायुक्त विजय बालमवार आदी उपस्थित होते.

अधिक पावसामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोडवर हिंदमाता परिसरातील सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असे. हा अनुभव लक्षात घेऊन महानगरपालिकेमार्फत येथील 180 मीटरच्या रस्त्याची उंची सध्याच्या पातळीपेक्षा 1.2 मीटरने वाढविण्यात आली आहे. या रस्त्याचे आज लोकार्पण करण्यात आले. यामुळे पूरजन्य परिस्थितीतही वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.

गांधी मार्केट येथील मिनी पंपिंग स्टेशनच्या कामाची पाहणी

महात्मा गांधी मार्केट येथील लघु उदंचन केंद्राच्या (मिनी पंपिंग स्टेशन) सुरू असलेल्या कामाचीही श्री.ठाकरे यांनी पाहणी केली. या ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्यांद्वारे प्रति मिनिट 2.33 लक्ष लिटर पाणी उपसण्याची क्षमता निर्माण होणार आहे. यावेळी महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू आदी उपस्थित होते.

पूरजन्य परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यास मदत होणार असल्याने या पंपिंग स्टेशनचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश श्री. ठाकरे यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *