हेडलाइन

हा ‘विकेंड’ नागपूरकरांनी महिला सक्षमीकरणासाठी द्यावा

Summary

हा ‘विकेंड’ नागपूरकरांनी महिला सक्षमीकरणासाठी द्यावा विभागीय सरस प्रदर्शन व महिला मेळाव्याला कुटुंबासह भेट दयावी   जिल्हाधिकारी आर. विमला, सीईओ योगेश कुंभेजकर यांचे आवाहन   मानकापूर क्रीडा संकुलात आज दहा हजारावर माहिलांचा मेळावा प्रतिनिधी- नागपुर नागपूर सह विभागातील सर्व जिल्ह्यांच्या […]

हा ‘विकेंड’ नागपूरकरांनी महिला सक्षमीकरणासाठी द्यावा

विभागीय सरस प्रदर्शन व महिला मेळाव्याला कुटुंबासह भेट दयावी

 

जिल्हाधिकारी आर. विमला, सीईओ योगेश कुंभेजकर यांचे आवाहन

 

मानकापूर क्रीडा संकुलात आज दहा हजारावर माहिलांचा मेळावा

प्रतिनिधी- नागपुर

नागपूर सह विभागातील सर्व जिल्ह्यांच्या बचत गटांच्या महिला मानकापूर स्टेडियम मध्ये शुक्रवार 3 ते 5 जून या कालावधीत विभागीय सरस प्रदर्शन व महिला मेळाव्याच्या निमित्ताने एकत्रित येणार आहे. या महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी नागपूरकरांनी आपल्या आठवड्याचा शेवट (‘विकेंड’) आपल्या कुटुंबासह मानकापूर स्टेडियममध्ये घालवावा असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

मानकापूर स्टेडियममध्ये या भव्य कार्यक्रमाचे उद्या सकाळी 10.00 वाजता उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, तसेच जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग जिल्हा संयुक्तरीत्या भूषवत आहे.

उद्या सकाळी दहा वाजता महिला मेळावा व सरस प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. मानकापूर स्टेडियममध्ये उद्घाटन सोहळ्याला दहा हजार महिला एकत्रित येण्याची अपेक्षा आहे. कार्यक्रमाला राज्याचे पशुसंवर्धन क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या उद्घाटक कृषी विकास ट्रस्टच्या विश्वस्त श्रीमती सुनंदाताई पवार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्‍मी बर्वे तर विशेष निमंत्रित व प्रमुख मार्गदर्शक अनुजा सुनील केदार महिलांशी संवाद साधणार आहेत. व्यासपीठावर जिल्हाधिकारी आर. विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपाध्यक्ष सुमित्रा मनोहर कुंभारे, सभापती तापेश्वर पुंडलिक वैद्य,सभापती उज्वला बापु बोढारे,सभापती नेमावली उध्दल माटे, सभापती भारती पाटील, त्याशिवाय जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य विविध समित्यांचे सदस्य उपस्थित राहणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या सरस प्रदर्शनात नागपूर विभागातून ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या विविध नाविन्यपूर्ण वस्तूंची खरेदी नागपूरकरांना करायला मिळणार आहे. वेगवेगळी शेकडो फुड स्टॉल, विक्री प्रदर्शनी, व दररोज रात्री रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूरकरांनी आपल्या आठवड्याचा शेवट (विकेंड) परिवारासह याठिकाणी येऊन साजरा करावा, असे आवाहन आज प्रशासनाने केले आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेपासून अन्य व्यवस्था करण्यात आली असून सुसज्ज शामियाना उभारण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आर. विमला व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन मानकापूर विभागीय क्रीडा संकुलाची पाहणी केली. या ठिकाणी वाहतूक व्यवस्था व पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी विद्यार्थ्यांनी विशेषता महिलांनी विभागातील महिलांच्या उद्यमशीलता, कौशल्य व मेहनतीला दाद देण्यासाठी मानकापूर स्टेडीयमला अवश्य यावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *