हरणे बंदर याचा लवकरच होणार कायापालट राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मच्छीमार बांधवांच्या बैठकीत दिली ग्वाही
Summary
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बंदराचा लवकरच कायापालट होणार आहे. तसेच अंजर्ला येथे ग्रायन्स पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद लवकरच करण्यात येणार असल्याची ग्वाही राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमीन विकास व विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. […]
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बंदराचा लवकरच कायापालट होणार आहे. तसेच अंजर्ला येथे ग्रायन्स पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद लवकरच करण्यात येणार असल्याची ग्वाही राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमीन विकास व विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. मुंबई येथील त्यांच्या दालनात गुरुवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार योगेश कदम, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील, अधीक्षक अभियंता सुधीर देवरे, नियोजन अधिकारी बढीए तसेच मच्छीमार संघटनेचे सोमनाथ पावशे, हेमंत चोगले, बाळकृष्ण पावशे, दत्ताराम पेढेकर, पीएन चोगले, काशिनाथ पावशे, गोपीचंद चोगले आदी उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे हे प्रमुख बंदर आहे. मात्र अनेक वर्षापासून या बंदराचा विकास न झाल्याने मच्छीमार बांधवांना अडचणींना सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात वादळा पासून बोटींच्या संरक्षणासाठी तेथे कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे या बंदराचा विकास होण्यासाठी आमदार योगेश कदम आणि मच्छीमार बांधवांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे मागणी केली होती. तसेच बोटी लावण्यासाठी सध्या मच्छीमार बांधवांना आंजर्ले खाडीमध्ये जावे लागते. या खाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ असल्याने अपघात होतात. त्या आजर्ले खाडीच्या येथेही बंधारे बांधण्याची मागणी यावेळी मच्छीमार बांधवांनी केली. या दोन्ही मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन या यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
मराठवाडा
प्रतिनिधी
सिल्लोड
शेख चांद
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क