हकीम साहेब जयंतीनिमित्त महाविद्यालयात वृक्षारोपण व स्वच्छता अभियान स्थानिक प्रतिनिधी, आष्टी

गडचिरोली चामोर्शी – तालुक्यातील आष्टी येथे
दि. 1 जुलै 2025 रोजी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आष्टी येथे वन वैभव शिक्षण मंडळ अहेरीचे संस्थापक सचिव माननीय अब्दुल हकीम अब्दुल रहीम साहेब यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण व परिसर स्वच्छता उपक्रम आयोजित करण्यात आले. त्या नंतर महाविद्यालयातील बी. ए. प्रथम वर्ष्याच्या विद्यार्थ्यांना वृक्षारोपण काळाची गरज आहे याविषयी
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) कार्यक्रम अधिकारी प्रा. रवी गजभिये यांच्या नेतृत्वात महाविद्यालय परिसरात विविध प्रजातींचे वृक्ष लावण्यात आले.
कार्यक्रमाला महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, आष्टीचे मुख्याध्यापक पाचभाई सर, प्रमुख उपस्थिती निवृत्त प्राचार्य मा. श्रीधर चौधरी सर यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. मुसने, डॉ. खूने, डॉ. शास्त्रकार, डॉ. पांडे, डॉ. कोरडे, श्री. भोयर, खोब्रागडे, नाकाडे, बच्छाड यांनी सहभाग घेतला.
राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी परिसर स्वच्छता करून स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले.
या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे सहभाग घेतल्याने पर्यावरणपूरक संदेश प्रसारित करण्यात यश आले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग व क्रीडा विभाग यांच्या द्वारे करण्यात आले.
पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
गडचिरोली चामोर्शी
प्रतिनिधि
गजानन पुराम
मो .7057785181